शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यराणी एक्सप्रेस नांदेडला पळविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:16 IST

जिल्ह्यातील प्रवासी संतप्त : समाज माध्यमावर रेल्वेमंत्र्यांचे पत्र व्हायरल

ठळक मुद्देराज्यराणी एक्सप्रेस नांदेडहून सोडण्याचा घाट नांदेडच्या खासदारांसह रेल्वे प्रशासनाने घातला आहे. यासंबंधीचे रेल्वेमंत्र्यांचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

नाशिक :- नाशिक शहरासह जिल्ह्यातील चाकरमान्यांना मुंबईला जाण्यासाठी पंचवटी ला पर्याय म्हणून सोयीची असलेली मनमाड- मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस नांदेडहून सोडण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना राज्यराणी गाडी नांदेडहून सुटणार असल्याचे दिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्ह्यातील प्रवाशी संतप्त झाले आहेत.राज्यराणी एक्सप्रेस ही जलद रेल्वेगाडी नाशिकसह जिल्ह्यातील प्रवाशी व मुंबई-नाशिक ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना सोयीची आहे. ही गाडी कधी भुसावळ तर कधी औरंगाबाद, नांदेड येथून सोडण्याविषयी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. यापूर्वीही मनमाडहून सुटणारी मनमाड - पुणे एक्सप्रेस ही भुसावळला पळविली गेली तर तपोवन एक्सप्रेस नांदेडला पळविण्यात आली. आता राज्यराणी एक्सप्रेस नांदेडहून सोडण्याचा घाट नांदेडच्या खासदारांसह रेल्वे प्रशासनाने घातला आहे. यासंबंधीचे रेल्वेमंत्र्यांचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. राज्यराणी एक्सप्रेस ही मनमाड ऐवजी हुजुर साहिब नांदेड येथून सोडण्याचा निर्णय झाला असल्याचे पत्र रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना दिले आहे. हेच पत्र फिरत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. नांदेडहून नवीन गाडी सुरु करून राज्यराणी मनमाडमधूनच सोडावी अन्यथा प्रवाशी तीव्र विरोध करून जनआंदोलन करतील, असा इशारा प्रवाशी व रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटणारराज्यराणीसंबंधी व्हायरल झालेल्या पत्राबाबत मी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटणार असून नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. जर राज्यराणी नांदेड हुन सोडली जाणार असेल तर नाशिककरांसाठी दुसरी रेल्वे मनमाडहून सोडावी अशी मागणी करणार आहे.- डॉ. भारती पवार, खासदार

 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे