शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजाभाऊ गोडसे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:41 IST

शिवसेनेचे माजी खासदार आणि जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशुराम गोडसे यांच्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दारणाकाठी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली परिसरातील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.

देवळाली कॅम्प : शिवसेनेचे माजी खासदार आणि जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशुराम गोडसे यांच्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दारणाकाठी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली परिसरातील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.गोडसे यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने शुक्रवारी (दि.१८) त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव येथील एका रुग्णालयात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. सकाळी हजारो नागरिक शिवसैनिक यांच्यासह वैकुंठरथातून सकाळी अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्यात परिसरातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दारणातीरावरील स्मशानभूमीत मुखाग्नी देण्यात आला. यावेळी सर्व पक्षांच्या मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी मविप्रचा आधारवड गेल्याचे म्हटले, तर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी शिवसेनेचा नेता अस्तास गेल्याचे म्हटले.यावेळी आमदार बाळासाहेब सानप, राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गिते, अ‍ॅड. नितीन ठाकरे, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी महापौर दशरथ पाटील, उदय सांगळे, दत्ता गायकवाड, माजी आमदार जयंत जाधव यांनी राजाभाऊंच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. जगतगुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी लहवितकर यांनी निर्वाणी भजन व पसायदान म्हणून त्यांना अखेरचा निरोप दिला. अंत्ययात्रेस खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांच्यासह अन्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. देवळाली कॅम्प व्यापारी असोसिएशनच्या वतीने शहर परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला होता.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक