शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून राज ठाकरेंना मोदीद्वेषाने पछाडलं; मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'राज की बात'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:13 IST

नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले असल्याचा घणाघात फडणवीस यांनी आपल्या अखेरच्या सभेत नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर केला.

ठळक मुद्दे भाजपा सरकारने मनपाला पैसा पुरविला म्हणून मनसेचे इंजिन सुरळीत चालू शकले नाशिकमध्ये ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सध्या २ हजार कोटींची कामे सुरू

नाशिक : नोटबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मोदीद्वेषाने पछाडले आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज्य व केंद्रात भाजपाचे सरकार होते, याचा विसर त्यांना पडला. या सरकारने त्यांच्या विनंतीवरून पैसा पुरविला, त्यामुळे मनसेचे इंजिन नाशकात सुरळीत चालू शकले, असा खुलासाही फडणवीस यांनी सभेत बोलताना केला.

लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचारतोफा शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहे. तत्पुर्वी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे व आघाडी सरकारवर फडणवीस यांनी आपली अखेरच्या सभेतून तोफ डागली.

राज ठाकरे यांनी याच मैदानावर शुक्रवारी रात्री सभा घेऊन भाजपा सरकार व दत्तक पिता देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. मनसे काळात नाशिक शहरात झालेल्या विकासकामांची ‘झलक’ व्हिडिओतून दाखविली. त्यांचे दावे खोडताना शनिवारी सकाळी फडणवीस यांनी बोलताना सांगितले, राज ठाकरे यांच्या मनसेची महापालिकेत सत्ता होती, तेव्हा राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार होते, या सरकारने मनपाला पैसा पुरविला म्हणून मनसेचे इंजिन सुरळीत चालू शकले आणि विकासकामे त्यांना करता आली; मात्र त्याचे सर्व श्रेय ठाकरे आता घेत आहेत. राहिला प्रश्न नाशिकच्या विकासाचा तर नाशिकमध्ये ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सध्या २ हजार कोटींची कामे सुरू आहेत; मात्र मोदीद्वेषाने डोळ्यांवर झापडे पडल्यामुळे ठाकरे यांना ती विकासकामे दिसणार नाहीत. जशी सायकल, मोटारसायकल भाडे तत्वावर मिळते, अगदी तसेच शरद पवार यांनी राज ठाकरेंचे ‘इंजिन’ भाड्याने घेतले असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. 

फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

* आगे आगे देखो होता हैं क्या, राज ठाकरे यांना सुचक उत्तर.* मोदीद्वेषाने राज ठाकरे यांना पछाडले.* शरद पवार यांनी भाड्याने घेतलेले इंजिन केवळ तोंडाच्या वाफेवर चालणारे.* तोंडाच्या वाफेवर चालणारे इंजिन दिल्लीपर्यंत कधीही पोहचू शकणार नाही.* नाशिकमध्ये २ हजार कोटींची विकासकामे सुरू* जनतेचा पैसा लुटला म्हणून यापुर्वीच्या ‘पालका’ने तुरूंगवास भोगला.* मनसेच्या सत्ताकाळात पार पडलेल्या कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी पुरविला.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारChagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक