शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांची माफी मागावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 01:51 IST

देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद करता कामा नये, असेही आठवले यावेळी म्हणाले.

ठळक मुद्दे जातीय तेढ निर्माण न करण्याचाही दिला सल्ला

देवळाली कॅम्प : देशाचा कारभार संविधानाने चालतो. त्यामुळे भोंगे काढण्याची, वाजविण्याची भाषा करून समाजासमाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. राज ठाकरे यांच्या अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद करता कामा नये, असेही आठवले यावेळी म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवळाली कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सभेत आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे होते. यावेळी आठवले यांनी सध्या देशात सुरू असलेल्या भोंगे आणि अयोध्या प्रकरणावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यास विरोध नाही; परंतु उत्तरभारतीयांची माफी मागावी, धर्मा धर्मात तेढ निर्माण करू नये कारण भगवा रंग हा गौतम बुद्धांचा आहे. बुद्ध व भगवा रंग शांततेचा आहे. ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालिमीत तयार झालेले असल्याने वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको, असा सल्लाही त्यांनी दिला.

रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र आल्यास पक्षाचे प्रतिनिधित्व दिल्लीसह राज्यात निर्माण होईल. यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारायला आपण तयार आहोत, शिवाय आपला प्रवास पँथर ते रिपब्लिकन पार्टी असा झालेला असून रक्ताच्या शेवटपर्यंत रिपाइंच राहू, असे त्यांनी सांगितले. यावेळी अमोल पगारे, चंद्रकांत भालेराव, सिद्धार्थ पगारे, आर डी जाधव, अशोक साळवे, गौतम भालेराव, संतोष कटारे, पंडित साळवे, सुभाष बोराडे, गौतम पगारे, संजय भालेराव, प्रभाताई धिवरे, विश्वनाथ काळे, नितीन साळवे, राजू वाघमारे, जयंतीभाई गडा, भगवान कटारिया, योगेश लोखंडे, आदी उपस्थित होते.

चौकट...

मशिदींसमोर गळे कशाला काढता?

भोंगे कशाला काढायचे? हनुमान चालिसा जरूर म्हणा; पण मशिदींसमोर जाऊन गळा काढू नका. संविधनातील भारत उभा करायचा आहे. सर्वांना एकत्र आणून सुखशांतीने जीवन जगायचे आहे. वाद कशाला करायचा, असेही आठवले यावेळी म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरे