शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
10
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
11
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
12
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
13
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
14
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
15
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
16
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
17
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
18
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
19
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
20
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार

'मोदींनी मलाही मूर्ख बनवलं', 'तो' व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 21:53 IST

राज यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे व्हीडिओ दाखवून या दोघांनीही आपल्याला मूर्ख बनवल्याचं म्हटलं.

नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नाशिकमधील सभेत सर्वप्रथम मनसेने केलेल्या 5 वर्षातील विकासकामांचा व्हिडीओ दाखवून राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि नरेंद्र मोदींवर तोफ डागली. मोदींनी काळा पैसा भारतात आणतो आणि ते पैसे तुमच्या सर्वांच्या, नियमित टॅक्स भरणाऱ्या नोकरदारांच्या बँक खात्यात टाकतो, असे म्हटल्याचा व्हिडीओ राज यांनी दाखवला. तसेच, कसं तुम्हाला मूर्ख बनवलं, अहो मलाही मुर्ख बनवलं, असे म्हणत राज यांनी पश्चातापाची भावना नाशिकमधील सभेत व्यक्त केली. 

राज यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे व्हिडीओ दाखवून या दोघांनीही आपल्याला मूर्ख बनवल्याचं म्हटलं. रॉबर्ड वाड्रा यांना तुरुगात टाकतो असं भाजपावाले म्हणले होते. पण, 6 महिन्यांपूर्वी अमित शहांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पाहा, असे म्हणत अमित शहांचा एक व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये, अमित शहांनी रॉबर्ड वाड्रांना तुरुंगात टाकतो, असं आम्ही कधीही म्हटलंच नसल्याचा, व्हीडिओ राज यांनी दाखवला. मोदींना झटका आला आणि नोटीबंदी केली. मात्र, ही नोटाबंदी पूर्णत फसली. देशातील नागरिकांना कशाप्रकारे रांगेत  उभे राहावे लागले आणि त्यांना किती भयानक संघर्ष स्वताचेच पैसे मिळविण्यासाठी करावा लागला, हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले. मोदी, आता केवळ जातीचे आणि पुलवामातील शहिदांचे राजकारण करत असल्याचे राज म्हणाले. मी खालच्या जातीचा असल्यामुळे मला लक्ष्य करतात अस मोदी सांगतात. मग, दलित बांधवांवर अत्याचार झाले तेव्हा मोदी काय करतात, असे म्हणत राज यांनी गुजरातच्या उना येथील दलितांवरील अत्याचाराचा व्हिडीओ दाखवला.

राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेतही पुन्हा मोदी आणि अमित शहांवर प्रहार केला. तसेच राज्यातील पाण्याच्या टंचाईवरुन फडणवीसांना लक्ष्य केले. जलसंपदामंत्री याच जिल्ह्यातले आहेत ना, मग आजही महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भिरतोय. फडणवीस एक लाख वीस हजार विहिरी बांधल्या असं  सांगतायेत, मग पाणी कुठंय, असाही प्रश्न राज यांनी विचारला. दरम्यान, राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या राज यांच्या धडाकेबाज सभांची आज सांगता झाली. आजही नाशिकमधील सभेत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. नाशिकमधील महिलांची पाण्यासाठी होत असलेली वणवण राज यांनी आज आपल्या व्हीडिओतून दाखवली. 

राज यांच्या भाषणातील मुद्दे

महाराष्ट्र पोलिस दलातील शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणारे प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देऊन मोदी, शहा यांनी समर्थन केले, ही गंभीर बाब.

लोकशाही राहणार की हुकूमशाही येणार, याचा फैसला करणारी ही निवडणूक

नोटीबंदीमुळे देश खड्ड्यात गेला, नोटबंदी फसली. आता मोदींनी सांगावं कुठल्या चौकात ? असे म्हणत राज यांनी मोदींना लक्ष्य केले.नरेंद्र मोदी यांनी देशात,  देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भूलथापा मारल्या.नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील बर्डेवाडी येथील तळ गाठलेल्या विहिरीत महिला दोरखंडाने उतरताना व्हिडीओ दाखवून फडणवीस यांनी खोदलेल्या विहिरी गेल्या तरी कोठे.साडे चार वर्षांपूर्वीचे 70 हजार कोटी रुपये गेले कोठे? भाजपा सरकार देखावा किती करणार? जनतेला लक्षात आले आहे. हे आता तुम्ही लक्षात घ्या.भाजपा शिवसेना सरकारने राज्यात जलसंधारणची कामे कोठे अन कशी केली ? कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला हमीभाव मिळवून देण्याचे आश्वासन देणारे मोदी यांचे भाषण दाखविले अन फेकू चौकीदारच्या घोषणा सुरू

जातीयवादाचे विष पेरून राजकीय स्वार्थ मोदी साधत आहेत. भारतीय जवानांच्या भावनांना हात घालून मतं मागण्याचा धक्कादायक प्रकार

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक