शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

राज-पवार एकाच दिवशी नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:00 AM

राष्टÑवादी कॉँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते १६ आॅक्टोबरला नाशिकमध्ये येणार आहेत. दोन्ही पक्षप्रमुख एकाच दिवशी नाशिकला येणार असल्याने मनसे आणि राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचीच चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देभूमिकेकडे लक्ष : दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते १६ आॅक्टोबरला नाशिकमध्ये येणार आहेत. दोन्ही पक्षप्रमुख एकाच दिवशी नाशिकला येणार असल्याने मनसे आणि राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचीच चर्चा रंगली आहे.राज्यात नाशिक, पुणे आणि ठाणे अशा तीन महानगरांमध्ये राष्टÑवादी आणि मनसेने पक्षीय स्तरावर समझोता घडवून आणला आहे. पुण्यातील कोथरूड आणि ठाणे शहराच्या जागेवर मनसेच्या उमेदवाराला राष्टÑवादीने पाठिंबा देत त्यांच्या उमेदवाराला माघारी घेण्यास सांगितले, तर नाशिक पूर्वमध्ये उभ्या असलेल्या मनसेच्या उमेदवाराला राष्टÑवादीच्या उमेदवारासाठी माघार घेण्याचे आदेश आल्याने या तीन जागांवर मनसे आणि राष्टÑवादीत समन्वय घडून आला आहे. त्यामुळे १६ आॅक्टोबरला जेव्हा दोन्ही पक्षप्रमुख नाशकात असतील, त्यावेळी नाशिक पूर्वसाठी काही विशेष बैठका घेतल्या जाणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला बहर आला आहे.राज ठाकरे यांची २०१४ पर्यंत भाजपच्या बाजूची भाषा होती नंतर मात्र ते पूर्णत: भाजप-सेनेच्या विरोधात भूमिका घेऊ लागले आणि त्यानंतर तर राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक वाढली. लोकसभेनंतर राज्यात आघाडी करण्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना मनसेलादेखील आघाडीत घेण्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्टÑवादी पक्ष त्यासाठी अनुकूल होता; मात्र हा विषय मागे पडला. त्यानंतर राज यांनी आधी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता नंतर मात्र त्यांनी मुंबई, पुणे व नाशिक येथेच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.तीन जागा भविष्यातील ‘लिटमस टेस्ट’कॉँग्रेसने नकार दिल्यामुळे मनसेला आघाडीत स्थान मिळाले नसले तरी राष्टÑवादीने त्यांच्या वाटेच्या जागांमधून मनसेला दोन जागी मदत दिली, तर नाशिकच्या एका जागेवर मदत घेतली आहे. या तीन जागांवर नक्की कसा रिझल्ट लागतो, ते पाहून भविष्यात मनसेबाबत व्यूहरचना आखण्याचा आघाडीचा मानस असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे तीन मतदारसंघ हे मनसेला आघाडीत समाविष्ट करण्यासाठीची ‘लिटमस टेस्ट’ असल्याचीही चर्चा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरे