नाशिक : भद्रकाली येथील राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ शिवसैनिक आणि परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर आणि नीलेश चव्हाण यांच्या हस्ते ५१ ज्येष्ठ शिवसैनिक आणि १५० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जुन्या शिवसैनिकांमध्ये अण्णा लकडे, विजय पंजाबी, भगवान बर्वे, पद्माकर पाटील, श्याम कांकरिया, अरुण पाचोरकर, दिलीप मैंद, प्रवीण मारू, बंडोपंत विंचूरकर आदिंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शंकरराव बर्वे, नगरसेवक विनायक पांडे, मधुकर झेंडे, शामला दीक्षित आदि उपस्थित होते. युवा सेना उपमहानगरप्रमुख गणेश बर्वे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)
राजे छत्रपती मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव
By admin | Updated: July 18, 2014 00:39 IST