शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेलिकन पार्कच्या जागेवर महिला रुग्णालय उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:17 IST

शहरातील आजी-माजी आमदारांच्या जागा निश्चितीच्या हट्टापायी महिला रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याने सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने करून या वादात नवीन भर घातली आहे.

नाशिक : शहरातील आजी-माजी आमदारांच्या जागा निश्चितीच्या हट्टापायी महिला रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याने सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने करून या वादात नवीन भर घातली आहे. भाजपाच्या मध्यच्या आमदार देवयानी फरांदे या मध्य मतदारसंघात रुग्णालय होण्यासाठी प्रयत्नशील असताना पेलिकन पार्कची जागा पश्चिम मतदारसंघात मोडली जाते व सदरची जागा गेल्या अनेक वर्षांपासून पडीत आहे. त्यामुळे जर ही मागणी मंजूर झाल्यास भाजपांतर्गत सुंदोपसुंदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९ साली तत्कालीन आघाडी सरकारने आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या मागणीनुसार खान्देश पॅकेज अंतर्गत १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले होते. यानंतर मनसेचे आमदार वसंत गिते यांनी रुग्णालयासाठी २४ कोटी रुपये मंजूर करून आणले. त्यानंतर विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र त्यांच्याच पक्षातील सुंदोपसुंदीमुळे निव्वळ जागेअभावी महिला रुग्णालयाची परवड होत आहे. सुरुवातीला महिला रुग्णालय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या जागी बांधण्यात येणार होते. तेथे वृक्षतोड नको म्हणून पर्यावरणाचे हित बघता जागा नामंजूर केली. नंतर टागोरनगर व वडाळागावाच्या जागेला स्थानिक नगरसेवकांनी विरोध केला. सध्याची प्रस्तावित टाकळी रोडवरील जागा दूर असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होईल, अशी भीती दाखविण्यात येत असून, भाभानगर येथील जागेस माजी आमदारांचा आणि स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याचे भासविले जात असल्याने शासनाचा २४ कोटी रुपये निधी पडून आहे. त्यामुळे महिला रुग्णालयासाठी सिडकोतील पेलिकन पार्कची जागा उचित पर्याय ठरेल. राजकीय वादात महिला रुग्णालयाचा बळी जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांना निवेदन देतेवेळी शहराध्यक्षा अनिता भामरे, मनीषा हिरे, रजनी चौरसिया, मीनाक्षी चव्हाण उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटलNCPराष्ट्रवादी काँग्रेस