शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 23:23 IST

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे.

ठळक मुद्देमनमाडला ढगाळ पावसाळी वातावरण

त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने कहर मांडला असून कालपासून अभ्राच्छादित वातावरण असल्याने सूर्याचे दर्शन नाही. थंडीतही वाढ झाली आहे. पावसाचा प्रकोप वाढल्याने शेतात अगर खळ्यात खरीप पिकांची हानी झाली आहे. परिसरात पावसाचा कहर वाढला आहे. पाऊस ढगफुटी झाल्याप्रमाणे धुंवाधार कोसळत नुकसान करत आहे. वसाने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. अचानक आलेल्या पावसाने ओहळ वाहायला लागले आणि शेतात सोंगून (कापणी केलेले) ठेवलेले भात पाण्यात भिजले आहे. शिवारात सर्वत्र अवकाळीच्या तडाख्यातून पीक वाचविण्याची लगबग दिसून येत आहे.नांदगावी जनजीवन विस्कळीतनांदगांव : बेमोसमी पावसाने दुपारी दोन वाजेनंतर वातावरणात प्रचंड गारठा पसरला असून थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे .दुपारी सुमारे एक तास ढगाळ वातावरणात झिम झिम पाऊस कोसळत होता, कोसळणाऱ्या पावसाचे थेंब अत्यंत गारांसारखे थंड लागत होते.हवेतील गारवा वाढत गेल्याने थंडीचा कडाका वाढत गेला आणि सायंकाळी ६ वाजेनंतर वाढत्या गारठ्यात पुन्हा पावसाचे थेंब कोसळत होते. थंडीमुळे शहरातील व ग्रामीण भागातिल लहान मोठे व्यावसायिक सायंकाळ होताच बंद करुन लवकरच घरी गेले.मनमाडला ढगाळ पावसाळी वातावरणमनमाड : ऐन हिवाळ्यात ढगाळ पावसाळी वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून या प्रतिकूल हवामानाचा थेट परिणाम कांदे,भाजीपाला आणि पिकांवर होत असल्याने निसर्गापुढे शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाले आहेत . मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ पावसाळी वातावरण होते . बुधवारी सकाळपासून तर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या.या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले . 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी