शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

येवल्यात पिकांना पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:23 IST

येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येवला : तालुक्यात मका पिकावर लष्करी अळी, तर सोयाबीनवर उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हंगामातील मुख्य पिके संकटात आली आहेत. त्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकेपाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामातील उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तालुक्यात यावर्षी मान्सूनपूर्व व प्रारंभी चांगला पाऊस झाला. या पावसावर शेतकरी वर्गाने खरीप मका, सोयाबीन, कापूस, मूग, भुईमूग, बाजरी आदी पिके घेतली. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर मका, सोयाबीन पिके आहेत. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी व सोयाबीन पिकावर उंट अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे.हळूहळू तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र अळींनी बाधित झाल्याने मका, सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांवरील अळींच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी शेतकऱ्यांनी ेकेली. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.खरिपाची पिके जोमात असताना गेल्या दहा-पंधरा दिवसात पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. मात्र, गेल्या तीन दिवसांत तालुक्यात सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अंदरसूल परिसरात मका पीक पडले तर पाटोदा, निळखेडे, कातरणी, विखरणी, देशमाने, मानोरी परिसरात पिके पाण्याखाली आली. आधीच अळींच्या आक्रमणाने धोक्यात आलेल्या पिकांना पावसाच्या पाण्याने संजीवनी मिळाली असली तरी काही भागात अतिपावसाने पिके धोक्यात आली आहेत.पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणीतालुक्यात यावर्षी सोयाबीनप्रमाणेच मका पिकाची स्थिती आहे. अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचा पोंगा बाधित झाला आहे. परिणामी यावर्षी तालुक्यात मका, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घटणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने अळीग्रस्त मका, सोयाबीन पिकाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागास द्यावे, नुकसानग्रस्त मका, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक