शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाणा, दिंडोरी, लोहोणेरला पाऊस

By admin | Updated: July 15, 2017 00:44 IST

सुरगाणा : सुरगाणा व परिसरात गुरुवार संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र व शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी- नाल्यांना पूर आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसुरगाणा : सुरगाणा व परिसरात गुरुवार संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र व शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी- नाल्यांना पूर आले.  गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते. केवळ पाच ते दहा मिनिटे पाऊस हजेरी लावून परत जात होता. मात्र गुरुवारी सायंकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर तो संपूर्ण रात्र व दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही कमीअधिक प्रमाणात सुरूच होता. एकदा पाऊस लागला की तो लवकर जातच नाही हे येथील पावसाचे वैशिष्ट्य आहे.  अजूनही येथे पाऊस सुरूच आहे. रात्रभर पाऊस झाल्याने सुरगाणा, उंबरठाण, बाऱ्हे, मनखेड, बोरगाव, करंजुल (सु), पळसन इत्यादी ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आले. असाच पाऊस सुरू राहिला तर झालेली लावणी (आवणी) गेल्या वर्षीप्रमाणे वाहून जाऊन नुकसान होण्याची चिंता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाने सातत्य ठेवल्याने आजचा आठवडे बाजार कमी भरला. तालुक्यात पाच ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले असून, सर्वाधिक पाऊस सुरगाणा येथे झाला. शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत सुरगाणा येथे १११ मि.मी., बोरगाव येथे १०८ मि.मी., मनखेड येथे ९३.०७ मि.मी., उंबरठाण येथे ९०.०८ मि.मी., तर बाऱ्हे येथे ८३.०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत तालुक्यातील पावसाची एकूण सरासरी ५८२ मि.मी. राहिली आहे.धरण क्षेत्रात पाऊसलोहोणेर : चणकापूर धरण क्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने परिसरातील नद्यांना पूर आला आहे. लोहोणेरचा डावा कालवाही पुराच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. चणकापूर धरण क्षेत्रात व कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, येथील बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. येथील बंधाऱ्यातून गिरणा नदीपात्रात होणारा विसर्ग यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अनुभवयास मिळाला आहे. गिरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत पूरपाण्याची वाढ झाल्याने पाटबंधारे खात्याच्या वतीने डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात आले असून, यंदा प्रथमच या डाव्या कालव्यास हे पूरपाणी सोडण्यात आले आहे .