शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

साकोरा परिसरात पावसाची ओढ; शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:00 IST

पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत आले तरी नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अजून पुरेसा पाऊस नसल्याने अवघ्या चाळीस टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर त्यातही वीस टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तर साठ टक्के शेतीतील मातीची ढेकळं फुटलेली नाहीत.

साकोरा : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत आले तरी नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अजून पुरेसा पाऊस नसल्याने अवघ्या चाळीस टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर त्यातही वीस टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तर साठ टक्के शेतीतील मातीची ढेकळं फुटलेली नाहीत. तसेच पाऊस नसल्याने गावात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गावकºयांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही पर्यायव्यवस्था न केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.  तालुक्यातील काही भागात जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला; मात्र साकोरा परिसरात अद्यापपर्यंत चांगला पाऊस झाला नसल्याने जमिनीला पुरेशी ओलदेखील न होता अजूनही मातीची ढेकळंदेखील फुटलेले नाहीत. काही हलक्या जमिनीत शेतकºयांनी पेरणी केली होती; मात्र कसदार जमिनीत अजूनही पेरणी झाली नसल्याचे चित्र आहे. परिसरातील अवघ्या ४० टक्के भागात पेरण्या झाल्या होत्या; मात्र पैकी २० टक्के भागात दुबार पेरणी झाल्याचे चित्र आहे, तर ६० टक्के जमिनीत अजूनही मातीची ढेकळं दिसून येत आहेत.तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा बंदपावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत आले तरी पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कमी झाले नसून गावासह परिसरातील सर्व विहिरी पूर्ण कोरड्या झाल्या आहेत. नदी-नाल्यांचे पारणे फिटले की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जलस्वराज्य योजनेच्या मन्याड शिवारातील उद्भव विहिरीच्या आजूबाजूला वाळूमाफियांनी मोठे खड्डे केल्याने सदर विहिरीतील पाणीसाठा खाली गेल्याने गावात तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. तरीदेखील ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली असून, गावकºयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आता तर गावातील खासगी बोअरवेल, वेशीजवळील हातपंप आणि उपशावर आलेली गावकीच्या विहिरीच्या आधारावर सध्या नागरिकांची तहान भागविली जात आहे; मात्र तरीही टंचाई जाणवत असल्याने संपूर्ण दिवसभर महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी