पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने पिंपळगाव सह संपूर्ण तालुक्यातील पिकांवर थैमान घालत शेतकऱ्यांना मरो की जगो करून सोडले आहे. एकीकडे राज्यातील मंत्री नुकसाग्रस्त भागात पाहणी करून गेले आणि मंत्र्यांनी पाठ फिरताच शुक्र वारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाला सुरु वात झाली व आतापर्यंत पिंपळगाव बसवंत परिसरात कमी वेळात ७५.३ टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील प्रवीण डेरे यांच्या अडीच एकर द्राक्ष बागेत गुढघ्याच्या वरती पाणी असल्याने या बागेत पूर स्थिती निर्माण झाली असल्याने या बागांना तलावाचे स्वरूप आले आहे. या द्राक्ष बाग वाचवण्यासाठी पानमोटार टाकून पाणी काढण्याची धडपड ते करीत आहे.निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरातील पाचोरे वणी, लोणवडी, कारसुळ, दावचवाडी, उंबरखेड, मुखेड, शिरवाडे वणी, अंतरवेली आदी गावाबरोबरच इतरही भागात शुक्र वारी (दि.१) रात्री बेमोसमी मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली होती. त्यात महिन्याभरापासून रोजच पाऊस अन् रोजच फवारणी सुरू असल्याने पीक पूर्ण होईपर्यंत लागणारे औषध फवारणीचा खर्च सुरवातीला लागल्याने नवीन औषधे घेण्यासाठी शेतकऱ्यांना उसनवारीने पैसे घ्यावे लागत आहे.त्यातच शेतातून पाणी बाहेर काढणे, अडकलेला ट्रॅक्टर काढणे शिवाय कुटुंबासह मजुरांचेही हाल त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाने कर्जमाफीचा अथवा भरपाई देण्याचा तात्काळ निर्णय घेतला जावा अशी शेतकरी प्रतिक्षा करीत आहे.छाटणी केलेल्या द्राक्षबागा व नविन फुटवा निघत असलेल्या, पोगा आणि फुलोरा तसेच मणी धरण्याच्या अवस्थेतील द्राक्षबागांचे आतोनात नुकसान झाले असून शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन, मका, टोमॅटो या पिकांची नासाडी या सततच्या पावसाने होत आहे. यात दररोज पडणाºया पावसाचे प्रशासन कितीवेळा आणि कसे पंचनामे करणार हा देखील प्रश्न शेतकºयांना सतावत असून शासनाने आता सरसकट कर्जमाफी करावी अशी परिस्थिती व मागणी शेतकरी करीत आहेत.अजून तीन ते चार दिवस पावसाची शक्यता....हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजुन तीन ते चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे हातात कोणतेच पिक शिल्लक राहणार नाही. द्राक्ष उत्पादकांचे हाल शब्दात व्यक्तच करता येणार नाही. द्राक्ष उत्पादकांच्या संघर्षाला अन् सहनशीलतेला आता मर्यादा राहिलेल्या नाहीत.आतापर्यंतच्या झालेल्या पावसाच्या तुलनेत शुक्र वारी झालेल्या पावसाचे प्रमाण सर्वाधिक होते. ज्या बागा आतापर्यत वाचवल्या होत्या, त्याचे देखील प्रचंड नुकसान झाली आहे. आणि ही नुकसान न भरून निघणारी आहे. शासनाला जर खरंच शेतकºयांचे हित असेल तर अनुदान देऊन शेतकºयांच्या जखमेवर मीठ न चोळता सरसगट कर्जमाफी करावी. नाहीतर येणाºया काळात शेतकºयांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.- प्रवीण डेरे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.पाऊस थांबेना अन् थांबलाच तर शेतकºयांचा निसर्गाशी लढाही संपेना अशा अवस्थेत द्राक्ष उत्पादक अडकला आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर ६० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात पिकांचे नुकसान झाली आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसानीच्या तुलनेत भरपाई देण्याऐवजी सरसकट कर्जमाफी करावी.- मनोज खोडे, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पिंपळगाव बसवंत.
पिंपळगाव परिसरात पावसाचा हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:43 IST
पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाने पिंपळगाव सह संपूर्ण तालुक्यातील पिकांवर थैमान घालत शेतकऱ्यांना मरो की जगो करून सोडले आहे. एकीकडे राज्यातील मंत्री नुकसाग्रस्त भागात पाहणी करून गेले आणि मंत्र्यांनी पाठ फिरताच शुक्र वारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाला सुरु वात झाली व आतापर्यंत पिंपळगाव बसवंत परिसरात कमी वेळात ७५.३ टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पिंपळगाव परिसरात पावसाचा हाहाकार
ठळक मुद्देद्राक्ष बागेला आले तलावाचे स्वरूप शेतकरी हवालदिल