शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

जोरदार वार्‍यासह शहरात पावसाच्या सरी

By admin | Updated: May 7, 2014 23:22 IST

नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला.

नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. वाढत्या तपमानामुळे नाशिकरांच्या अंगाची काहिली झालेली असतानाच सायंकाळी दाटून आलेले आभाळ आणि वाहणार्‍या वार्‍यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. आजचा पारा वाढलेला असतानाच सायंकाळच्या सुमारास आभाळ दाटून आल्याने वातावरणात अधिकच उकाडा निर्माण झाला होता. पावसाच्या थेंबांसह जोरदार वाराही वाहू लागल्याने शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. विशेषत: नाशिकरोड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वार्‍यासह कोसळणार्‍या पावसामुळे या भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे पंचवटीतील काही भागात काहीकाळ पावसाने हजेरी लावली. सिडको, सातपूर येथेही आभाळ दाटून आले; मात्र या ठिकाणी तुरळक पाऊस झाला. नाशिकरोडसह शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली, तर बुधवार बाजारातही व्यापार्‍यांचे चांगलेच हाल झाले. सायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे अगोदरच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर तेथील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. तीन फिडर्स नादुरुस्तजोरदार वार्‍यासह अवघ्या अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. सातपूर येथील ३३ केव्ही फिडरमध्ये बिघाड झाल्याने या फिडरवरील ग्राहकांना सुमारे तासभर वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सातपूर, महात्मानगर, त्र्यंबकरोड, तसेच गंगापूर परिसरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच ३३ केव्ही पंचक फिडरवरही स्ट्रिपिंग झाल्याने या फिडरवरील ग्राहकही हैराण झाले होते. टाकळी फिडर वाहिनीवर एकूण ११ ठिकाणी स्ट्रिपिंग झाल्यामुळे या वाहिन्यांवरील हजारो ग्राहकांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. वार्‍यासह पाऊस सुरू झाल्याने काही ठिकाणी वीज कंपनीनेच वीजपुरवठा तात्पुरता बंद केला होता. काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी करूनही सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ अनेक भागातील वीजपुरवठा खंडितच होता.