शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:31 IST

ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले, तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. नवरात्रोत्सवातील सहावी माळ असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवात भाविकांचे हाल

वणी : ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले, तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली.नवरात्रोत्सवातील सहावी माळ असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. सकाळपासून वातावरण स्वच्छ व आकाश निरभ्र होते. दर्शनासाठी बाऱ्याही लागल्या होत्या. रोप वे केंद्रातही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ट्रॉलीमध्ये बसण्यासाठी प्रतीक्षा भाविक करीत होते. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास गडावर जोरदार पावसास प्रारंभ झाला. दोन तासांपेक्षा अधिक काळ पाऊस कोसळत होता. अनपेक्षितपणेवरुणराजाने हजेरी लावल्याने भाविकांनी पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रसादाची दुकाने, हॉटेल्स, रस्त्याच्या कडेला तर काहींनी घरांचा आसरा घेतला.पाऊस सुरू असताना राममंदिरापर्यंत बाºया लागलेल्या होत्या. दरम्यान, गडावर धोंड्या-कोंड्याच्या विहिरीजवळ तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. मंदिर परिसरापासून हे अंतर एक किलोमीटरच्या पुढे आहे. या अंतरात निवाराशेडची व्यवस्था असणे गरजेचे आहे. कारण ऐनवेळी येणाºया पावसाचा फटका भाविकांना बसतो. एक किलोमीटर अंतर पायीयेणारे अनेक भाविक ओलेचिंब झाले तर रस्त्यालगत विविध दुकाने लावणाºया दुकानदारांनाही याचा फटका बसला.दरम्यान, ग्रामपालिकेच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निवाराशेडसाठीचा विविध ठिकाणांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच राजेश गवळी यांनी दिली. नवरात्र कालावधीत मागील वर्षापेक्षा यावर्षी भाविकांची हजेरी कमी आहे. त्यात पावसाच्या हजेरीमुळे गुंतवणूक करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरRainपाऊस