शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जूनच्या मध्यावधीत पावसाची वर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 00:24 IST

यावर्षी मान्सूनचे आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यासह नाशिकमध्येही होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याचा अंदाज : ‘अम्फॉन’मुळे होऊ शकतो परिणाम

नाशिक : यावर्षी मान्सूनचे आगमन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यासह नाशिकमध्येही होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे.१० जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी ‘अम्फॉन’ चक्रीवादळानंतर वेगाने वाहणाºया वाऱ्यांमुळे पुढील काही दिवसांत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास मान्सूनला ‘ब्रेक’ लागू शकतो. शहरातील तापमान चाळिशीपर्यंत पोहोचल्यानंतर आता दोन दिवसांपासून पुन्हा घट होऊ लागली आहे. बुधवारी(दि.२७) कमाल तापमान ३७.३ अंश इतके नोंदविले गेले, तर किमान तापमान २४.२अंश इतके होते. यामुळे नाशिककरांना काही प्रमाणात उकाडा जाणवत असला तरी वाºयाचा वेग वाढल्याने उष्म्यापासून दिलासाही मिळत आहे. बळीराजासह सर्वांनाच आता मान्सूनचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दाखल झालेला मान्सून १४ आॅक्टोबरपर्यंत कायम होता. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक शहरांना पावसाचा मोठा तडाखा सहन करावा लागला होता. यंदा केरळमध्ये जूनच्या पहिल्याच दिवशी मान्सून दाखल होणार असल्याने, यंदाही पावसाचा जोर चांगला असेल, असा अंदाज हवामान विभागाने लावला आहे.दरम्यान, बंगालच्या उपनगरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर १६ मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांत चालू महिन्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अम्फॉन चक्रीवादळानंतर मान्सूनच्या प्रगतीसाठीचे वारे निर्माण होत असल्याने, बंगलाच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम भागापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेच्या वरील भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानRainपाऊस