नाशिक : मान्सूनची सलग दुसऱ्या दिवशी नाशिकला हजेरी लागली. सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. दुपारी पावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर थोेडा वेळ कडक ऊन पडल्यानंतर मात्र पावसाची रिपरिप अधूनमधून सायंकाळपर्यंत सुरूच होती.सकाळपर्यंत जिल्ह्यात मात्र अवघ्या ८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. दुपारी बाराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलक्या सरी सुरू होत्या. नंतर मात्र काही वेळ जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर काही वेळ लख्ख सूर्यप्रकाश पडला होता. तीन वाजेनंतर मात्र पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत अधून-मधून पाऊस सुरूच होता. सायंकाळी पाऊस उघडला. मागील वर्षाच्या तुलनेत जूनच्या दोन आठवड्यांत यंदा पावसाची हजेरी कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. जूनच्या सरासरीच्या केवळ १० ते १२ टक्केच पावसाची हजेरी होती. पावसाला सुरुवात झाल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)
शहरात अनेक ठिकाणी पाऊस
By admin | Updated: June 20, 2014 21:45 IST