शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:36 IST

मध्य रेल्वे विभागातील इगतपुरी रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर बसविण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवार (११ ते १३ जानेवारी) काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वे मार्गाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपॉवर ब्लॉक : काही गाड्यांच्या मार्गात बदल

नाशिकरोड : मध्य रेल्वे विभागातील इगतपुरी रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर बसविण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवार (११ ते १३ जानेवारी) काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वे मार्गाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.इगतपुरी रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी शुक्रवार ते रविवार पहाटे ३.४५ ते सकाळी साडेदहापर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे तीनही दिवस मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१२) एलटीटी-गुवाहटी एक्स्प्रेस सकाळी आठऐवजी ९.१० वाजता, सीएसएसटी-नांदेड तपोवन एक्स्प्रेस सकाळी सव्वा सहाऐवजी नऊला सुटणार आहे. एलटीटी-फैजाबाद रायबरेली एक्स्प्रेस ही दिवा-वसई, जळगाव मार्गे पुढे जाणार आहे. तर सीएसटी-हावडा गीतांजली एक्स्प्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस दिवा-वसईरोड-जळगाव मार्गे पुढे जाणार आहे.रविवारी (दि.१३) एलटीटी-अलाहाबाद एक्स्प्रेस व एलटीटी-गोरखपूर काशी एक्स्प्रेस दिवा-वसई-जळगाव मार्गे, सीएसटी-हावडा गीतांजली एक्स्प्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे पुढे जाणार आहे. एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस सकाळी पावणे आठऐवजी ९.१० वाजता, एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस सकाळी आठ ऐवजी ९.३० वाजता, सीएसटी-नांदेड तपोवन एक्सप्रेस सकाळी सव्वासहा ऐवजी ९.०५ वाजता सुटणार आहे.सहकार्याचे आवाहनमहिन्याभरापूर्वीच इगतपुरी रेल्वेस्थानकात नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी महिनाभर ब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वेच्या कामासाठी घेण्यात येणाºया ब्लॉकच्या काळात प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे