नाशिकरोड : रेल्वे गाड्यांना विलंब होत असल्याने नाशिकच्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आठवडाभरापासून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने गाड्यांना विलंब होत आहे. परिणामी महिनाभर वाराणसी, कामायनी एक्स्प्रेससह अन्य गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. या कामामुळे अन्य रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. दि. २३ जूनला महानगरी, पाटलीपुत्र, गोरखपूर एक्स्प्रेस, हथेली एक्स्प्रेस या गाड्यांना तीन ते चार तास उशीर झाला. त्याचा फटका मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना बसला असून, त्यांची गैरसोय झाली. रद्द केलेल्या सर्व गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथे जाणाºया होत्या. या गाड्या रद्द झाल्यामुळे सध्या नियमित सुरू असलेल्या गोरखपूर, दरभंगा, हथेली, लष्कर यांसह इतर गाड्यांमधील प्रवाशांचा ताण वाढला आहे. शनिवारी मुंबईकडे जाणाºया या गाड्या तीन ते चार उशिराने धावत होत्या. चौथा शनिवार असल्यामुळे शासकीय अधिकारी कर्मचाºयांना सलग दोन दिवस सुटी होती. यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गर्दी झाली होती. मुंबईकडे जाणाºया गाड्यांना उशीर झाल्याने या प्रवाशांचा हिरमोड झाला. सकाळी दहाला येणारी महानगरी एक्स्प्रेस दीडनंतर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आली. महानगरी एक्स्प्रेसप्रमाणेच राजेंद्रनगर चार तास, गोरखपूर साडेतीन तास, हथेली एक्स्प्रेस सव्वा दोन तास, भुसावळ-मुंबई पॅसेंजर अडीच तास, मनमाड इगतपुरी सेंट्रल पॅसेंजर एक तास उशिराने आली.शटल महिनाभर बंदरेल्वे ट्रॅकच्या दुरु स्तीसाठी नाशिकरोड-भुसावळ शटल तांत्रिक कारणास्तव दि. २३ जून ते २० जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. ही गाडी बंद झाल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, रु ग्ण, व्यावसायिक यांचे नुकसान होणार आहे. नाशिकरोड ते भुसावळ दरम्यान देवळालीपासून भुसावळपर्यंत ही रेल्वेगाडी धावत असते. पाच वाजता ही गाडी नाशिकरोड येथून भुसावळकडे निघते. गाडीला कायम गर्दी असते. महिनाभर ही गाडी बंद असल्याने भुसावळकडे जाणाºया आणि रात्री नाशिकरोडकडे येणाºया प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे गाड्यांना विलंब; प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:26 IST