शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:19 AM

कसारा-खर्डीदरम्यान गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी टॉवर वॅगन व्हॅन रुळावरून घसरल्याने मुंबई-नाशिकदरम्यानची रेल्वे वाहतूक १२ तास विस्कळीत झाली होती. यामुळे पंचवटी, गोदावरी, राज्यराणी गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूने येणाऱ्या रेल्वे उशिराने धावत असल्याने व काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

ठळक मुद्देटॉवर वॅगन व्हॅन रुळावरून घसरली मुंबई-नाशिकदरम्यानची वाहतूक सेवा १२ तास विस्कळीत

नाशिकरोड : कसारा-खर्डीदरम्यान गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी टॉवर वॅगन व्हॅन रुळावरून घसरल्याने मुंबई-नाशिकदरम्यानची रेल्वे वाहतूक १२ तास विस्कळीत झाली होती. यामुळे पंचवटी, गोदावरी, राज्यराणी गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूने येणाऱ्या रेल्वे उशिराने धावत असल्याने व काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.कसारा-खर्डीदरम्यान गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास मुंबईकडून येणाºया डाउन मार्गावर ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी टॉवर वॅगन व्हॅन रुळावरून घसरून अपघात झाल्याने रूळ उखडले होते. यामुळे मुंबईकडून येणारी व जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अपघातानंतर काही तासांतच रूळ दुरुस्त व टॉवर वॅगन व्हॅन हलविण्याचे काम हाती घेण्यात आले. मुंबईकडे जाणारा अपचा एकच रेल्वे मार्ग सुरू होता. त्यामुळे मुंबईहून सुटणाºया व जाणाºया गाड्या ठिकठिकाणी थांबवून मार्गक्रमण करीत होत्या.तीन गाड्या रद्दनाशिककरांसाठी मुंबई-ठाणेकडे जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोदावरी, राज्यराणी या मनमाडवरूनच रद्द करण्यात आल्या होत्या, तर पंचवटी एक्स्प्रेस नाशिकरोडहून निर्धारित वेळेला गेल्यानंतर देवळाली कॅम्पला सकाळी १०.२४ पर्यंत तब्बल तीन तास थांबवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर इगतपुरीला गेलेली पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. मनमाड-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस इगतपुरीला रद्द करण्यात आली, तर पुणे-मनमाड हुतात्मा एक्स्प्रेस पुणे, दौंड-मनमाडमार्गे पाठविण्यात आली. नागपूर-सीएसटी सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडला शुक्रवारी सकाळी टर्मिनेट (रद्द) करण्यात आली. सायंकाळी ६.३० वाजता सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडहून नागपूरला रवाना झाली.रेल्वे मार्गात बदलमुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे रवाना झाली, तर एलटीटी वाराणसी रत्नागिरी एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर काशी एक्स्प्रेस, एलटीटी-गोहाटी एक्स्प्रेस, मुंबई-लखनौ पुष्पक एक्स्प्रेस या मुंबई-भोईसर-सुरत-जळगाव-भुसावळमार्गे सोडण्यात आल्या.उशिराने धावणाºया गाड्याएलटीटी-मुजफ्फर पवन एक्स्प्रेस चार तास, एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस-२ तास व मुंबईला जाणाºया अमरावती एक्स्प्रेस, हावडा मेल, जनता एक्स्प्रेस, वाराणसी-मुंबई, महानगरी, भुवनेश्वर-एलटीटी, पाटलीपुत्र-एलटीटी, गोरखपूर-पनवेल या गाड्या तीन ते चार तास उशिरानेव थांबत-थांबत मार्गक्रमण करत होत्या.टॉवर वॅगन व्हॅनच्या अपघातामुळे तब्बल १२ तासांनंतर शुक्रवारी दुपारी दोन वाजता अप-डाउन मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. रेल्वे उशिराने धावत असल्याने काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने सकाळपासून नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. यामुळे काही प्रवाशांनी आपला पुढील प्रवास रद्द केला तर काही जणांनी रस्ता मार्गे प्रवासाचा मार्ग स्वीकारला. शुक्रवारी सायंकाळी अप-डाउन मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत झाली होती.्नरोजच्या प्रवाशांचे नियोजन चुकलेमुंबई, ठाणे भागात व्यवसाय, नोकरी, खरेदी, शिक्षण आदी कामांसाठी दररोज जाणाºया नाशिककरांच्या दृष्टीने राज्यराणी, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेस महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आहेत. मात्र राज्यराणी, गोदावरी मनमाडलाच रद्द करण्यात आली, तर पंचवटी एक्स्प्रेस नाशिकरोडहून निर्र्धािरत वेळेला निघून तीन तास देवळाली कॅम्पला थांबल्यानंतर इगतपुरी रेल्वेस्थानकावर रद्द करण्यात आली. यामुळे दररोज मुंबई-ठाणे ये-जा करणाºया प्रवाशांचे नियोजन व अंदाज चुकून गेला होता. यामुळे बहुतांश प्रवाशांनी आज सुट्टी घेतली, तर काही जणांनी रस्ता मार्गे जाणे पसंत केले. उशिराने धावणाºया रेल्वे, काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने व काही रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे नियोजन चुकल्याने अतोनात हाल झाले.दीड लाखाचे तिकीट आरक्षण रद्दच्टॉवर वॅगन व्हॅनच्या अपघातामुळे मुंबई-नाशिक रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने १ लाख २८ हजार १०५ रुपयांचे १७७ रेल्वे आरक्षण रद्द करण्यात आले, तर २५ हजार ७३५ रुपयांचे ३०० तिकीट रद्द करण्यात आले. आरक्षण व तिकीट रद्द करणाºया प्रवाशांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर एक लाख ५३ हजार ८४० रुपयांचा परतावा देण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी