शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

रेल्वे, एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:40 IST

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांपुढे पेच : अनेकांना एका परीक्षेला मुकावे लागणार

देवगांव : महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा (एमपीएससी) १४ मार्च ऐवजी २१ मार्च रोजी घेण्यात येणार आहे, तर याच दिवशी रेल्वेची परीक्षासुद्धा होणार आहे. वर्षभरापासून असंख्य विद्यार्थी दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत आहे. त्यामुळे कोणत्यातरी एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार असून कोणत्या परीक्षेस प्राधान्य द्यायचे किंवा दोन्ही परीक्षेच्या परीक्षा केंद्रावर कसे पोहोचायचे, या संभ्रमात विद्यार्थी सापडला असून पेच निर्माण झाला आहे.अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ग्रामीण भागातील विद्यार्थी तासन‌्तास अभ्यास करत आहेत. एमपीएससी परीक्षा आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे पाच वेळा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांच्या वयाबरोबरच मेहनतही वाया जात असल्याने विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन केले होते. तेव्हा शासनाने २१ मार्च रोजी परीक्षेची तारीख जाहीर केली; पण याच तारखेला पूर्व नियोजित रेल्वे परीक्षा घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या चार टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेचा पहिला टप्पा जानेवारीमध्ये पार पडला. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा २१ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी नियोजनपूर्वक अभ्यासावर भर दिला होता. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील परीक्षा दिली आहे, तर आता एकाच दिवशी एमपीएससी व रेल्वे परीक्षा येत असल्याने कोणती परीक्षा द्यावी आणि कोणती टाळावी हा पेच विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून वर्षभर केलेला अभ्यास तसेच वर्ष वाया जाणार अशी हुरहूर लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले आहे.केंद्रावर पोहण्यासाठी कसरतरेल्वेच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र नसल्यामुळे त्यासाठी मुंबई, वाशी, नवी मुंबई, ठाणे, पालघर आदी ठिकाणी जाऊन परीक्षा द्यावी लागेल. नाशिक आणि मुंबई अशा दोन बाजू असल्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहचण्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊन तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच आता कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्यामुळे काळजी घेण्याची आव्हान उभे आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अभ्यासिका आणि वाचनालय बंद असताना देखील विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन जोमाने परीक्षेची तयारी केली. मात्र, ऐनवेळी दोन्ही आणि खासगी परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.- रघुनाथ मोरे, परीक्षार्थी.आज स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता विविध स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतो. मात्र, एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्यामुळे परीक्षेस हजर राहण्यासाठी मोठी तारांबळ होणार आहे.- संपत दोंदे, परीक्षार्थी.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा