शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मल्याळी असोसिएशनतर्फे रेल्वेद्वारे मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:51 IST

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले.

नाशिकरोड : केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले.  केरळमध्ये अतिवृष्टी व पावसाच्या पुरामुळे फार वाताहत होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून श्री घंटी म्हसोबा मंदिरामागील एका मंगल कार्यालयात सर्व प्रकारची मदत गोळा करण्यात येत होती. अन्नधान्य, पाण्याच्या बाटलीचे बॉक्स, पाणी उपसा करणारे २५ पंप, कपडे आदी विविध प्रकारच्या जमा झालेल्या वस्तू, साहित्य तीन ट्रकमधून बुधवारी सायंकाळी रेल्वे माल धक्क्यावर आणण्यात आले. तेथून मालट्रकमधील सामान रेल्वे वाहतुकीच्या दोन व्हीपीमधून लागलीच मुंबईला रवाना करण्यात आले. केरळ पूरग्रस्तांना पाठविण्यात येणारी मदत रेल्वे प्रशासनामार्फत मोफत पाठविण्यात येत आहे. नाशिकरोड वाणिज्य विभागाचे निरीक्षक कुंदन महापात्रा यांनी केरळ पूरग्रस्तांना सामान पाठविण्यासाठी तातडीने दोन व्हीपी उपलब्ध करून दिल्या आहेत.  यावेळी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशन नाशिकचे संस्थापक रणजित नायर, अध्यक्ष के.पी. कोशी, जॉर्जी पी. जॉन, दिनो मॅथ्यु, शिनु जोस, उत्तम पिल्ले, राईटसन् बर्नाल्ड, अर्जुन नायर, सुरेन्द्र नायर, रमय्या नायर, रश्मी नायर, वलंसरा नायर, एलिझाबेथ सत्येन, आशा बाबू, डिन्सी बाबू, राधा मोहन, शिवनारायण सोमाणी, कैलास भालेराव आदी उपस्थित होते.माथाडी कामगारांची मदतकेरळ पूरग्रस्तांना विविध संस्था, संघटना, समाजाकडून गोळा होणारी मदत ट्रक, टेम्पोमधून रेल्वे माल धक्क्यावर आल्यानंतर माथाडी कामगारांनीदेखील कुठलेही पैसे न घेता सदर माल, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये मोफत व्यवस्थित रचून भरून दिला. विशेष यापूर्वी गेलेल्या सातही व्हीपी या मध्यरात्री रेल्वे माल धक्क्यावर आल्यावर झोपेतून उठून माथाडी कामगारांनी रातोरात ट्रक, टेम्पोमधील सामान, वस्तू रेल्वेच्या व्हीपीमध्ये भरून केरळ पूरग्रस्तांना मदत केली आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरfundsनिधी