राजदेरवाडी किल्ल्यावर ५१ तरुणांची चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 06:30 PM2019-07-25T18:30:51+5:302019-07-25T18:31:24+5:30

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ल्यावर चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा मंडळाच्या ५१ तरुणांनी यशस्वी चढाई केली तर परिसरात काही काळ त्यांनी श्रमदानही केले.

The raid of the Rajaderwadi fort with 3 youths | राजदेरवाडी किल्ल्यावर ५१ तरुणांची चढाई

चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला चढण्यासाठी शासनाच्या मदतीने करण्यात आलेला जिना. त्यामुळे किल्याची चढाई सोपी झाली आहे.

Next

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी किल्ल्यावर चांदवड येथील श्री. संत गाडगेबाबा मंडळाच्या ५१ तरुणांनी यशस्वी चढाई केली तर परिसरात काही काळ त्यांनी श्रमदानही केले. या निसर्गरम्य राजदेरवाडी किल्ल्यावर या तरुणांनी चढाईचा आनंद लुटला तर येथील सुधारणा खूपच चांगल्या झाल्याची प्रतिक्रिया मंडळाचे प्रमुख संदीप उगले व तरुणांनी दिली.
चांदवडपासून १० किमी अंतरावर सुंदर असे राजदेरवाडी गाव आहे आणि त्या गावाच्या डोंगरावर छान असा किल्ला आहे. पूर्वी या किल्ल्यावर जाणे खूप अवघड होते; पण चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर व राजदेरवाडी गावाचे उपसरपंच मनोज शिंदे यांच्या प्रयत्नाने एक भव्य असा जिना या किल्ल्यावर चढाई करण्यासाठी अवघड वळणावर लावला असून, पूर्वी येथे जीवघेणी शिडी होती. चांदवड येथील श्री संत गाडगेबाबा मित्रमंडळाच्या ५१ तरुणांनी या किल्ल्यावर चढाई केली हे तरुण खूप थकले. त्यांनी किल्ल्यावर काही काळ श्रमदान केले. पण जेव्हा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो त्यावेळी थकवा कमी झाला व सर्वजण जिन्याने वर चढल्यामुळे किल्ल्यावर फिरता आल्याने तरुणांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: The raid of the Rajaderwadi fort with 3 youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.