शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे रब्बी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:38 IST

सायखेडा : जिल्ह्यामध्ये पहाटेच्या वेळी धुके पसरत असले तरी ऐन हिवाळा असूनही केवळ कधी कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण अद्याप सुरू आहे. याचा फटका रब्बीतील पिकांवर होत असून, गहू, हरभरा, ज्वारी पिके संकटात आली आहेत. एकीकडे वातावरणातील बदलांमुळे पीक अडचणीत आले असताना दुसरीकडे पिकांवर अळीचे आक्रमण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनके ठिकाणी दुबार पेरणीचेही संकट गहिरे झाले आहे.

ठळक मुद्देगहू, हरभरा धोक्यात : दुबार पेरणीचे संकट, अळींचे संक्रमण

यंदा म्हणावा तसा हिवाळा अद्याप सुरू झालेला नाही. डिसेंबर अर्ध्याहून जास्त उलटून गेल्यानंतरही वातावरणात आवश्यक बदल झालेला नाही. शेतकऱ्यांनी खरिपातील मका पीक काढणीनंतर गहू, हरभरा, तूर, कांदा, लसूण आदी पिकांची मोठ्या उत्साहाने लागवड केली; मात्र वातावरणातील बदलामुळे ही पिके धोक्यात येत आहेत. या बदलामुळे सध्या गहू पिवळा पडू लागला आहे. त्याची वाढही खुंटली आहे. या मोसमाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. यानंतर मातीतील ओलावा निघून जाण्यास बराच अवधी लागल्याने पेरण्या उशिराने झाल्या होत्या. यानंतर सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा शेतकरी धरून होते; परंतु अद्याप वातावरणात आवश्यक गारवा निर्माण झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शेतकऱ्यांनी खरिपानंतर जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशाने टोकन पद्धतीने गव्हाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने गहू पेरला; मात्र वातावरण साथ देत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊन-सावलीच्या खेळात गहू पिवळा पडू लागला आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीमध्ये भरून निघेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी रब्बी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधांची फवारणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न करताना शेतकरी दिसत आहेत. सध्या सकाळी बऱ्याच वेळ धुके, दुपारच्या वेळी ऊन तर संध्याकाळी साधारण थंडी पडत आहे. हा बदल रब्बी पिकांसाठी त्रासदायक असल्याचे बोलले जाते. जाणकारांच्या मते, या अवस्थेत पिके करपतात, रोग पडण्याच्या आधीच्या अवस्थेत रोगाच्या चिपट्यादेखील करपतात. हरभरा सध्या फुले येण्याच्या अवस्थेत आहे. त्यास धुक्याचा विपरित परिणाम घडत असतो.किडींचाही धोका वाढला!पर्यावरणातील असमतोलामुळे एकीकडे पिकांची वाढ खुंटली असताना दुसरीकडे किडींचाही प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. पेरणी केलेल्या गहू पिकाने आता डोके वर काढले असताना अळीचे आक्रमण सुरू झाले आहे. या अळीने फुलांना पोखरण्याचे काम सुरू केले असल्याने अनेक कोंब जागेवरच गळून पडत आहेत. गहू आणि हरभऱ्याची सारखीच स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी