शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

राज्य परिवहन नाशिक आगारात नेमणार बुकिंग एजंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:33 IST

अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ एसटीत मोफत वायफाय सुविधा, आवडेल तेथे प्रवास योजना, आॅनलाइन बुकिंग, वातानुकूलित बसप्रवास अशा निरनिराळ्या योजना राबवित असते. हाच धागा पकडत राज्य परिवहन महामंडळाने प्रायोगित तत्त्वावर नाशिक व रायगड या दोन आगारांमध्ये खासगी बुकिंग एजंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

भाग्यश्री मुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे वळविण्यासाठी आणि उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ एसटीत मोफत वायफाय सुविधा, आवडेल तेथे प्रवास योजना, आॅनलाइन बुकिंग, वातानुकूलित बसप्रवास अशा निरनिराळ्या योजना राबवित असते. हाच धागा पकडत राज्य परिवहन महामंडळाने प्रायोगित तत्त्वावर नाशिक व रायगड या दोन आगारांमध्ये खासगी बुकिंग एजंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सप्टेंबरपासून नाशिकमध्ये बुकिंग एजंट नेमून प्रवाशांना सेवा दिली जाणार आहे. या अंतर्गत इगतपुरी ते मालेगाव, नाशिक, ओझर, येवला, घोटी बायपास, आडगाव, औरंगाबादरोड, पाथर्डी फाटा, वडाळीभोई, चांदवड, उमराणे, सौंदाणे, टेहरे, द्वारका, पिंपळगाव आदी पॉइंटवर बुकिंग एजंट नियुक्त केले जाणार आहेत. हे बुकिंग एजंट त्या त्या थांब्यावर आलेल्या प्रवाशांना तिकीट देणार असून, प्रवासासंदर्भात त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत. याशिवाय या एजंटांकडे बसचे लोकेशन समजू शकणारी यंत्रणा देण्यात येणार असून, बस या क्षणाला कुठे आहे हे ते सांगू शकणार आहेत. हे एजंट एकमेकांना बझरच्या सहाय्याने बस निघाल्याची, बस नंबर, बसमधील पॅसेंजरची संख्या, लागणारा कालावधी याबाबत माहिती देणार आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार असून, त्यांना इच्छित स्थळी पोहोचणे सुलभ होणार आहे. या एजंटांकडून तिकीट घेतल्यानंतर प्रवाशांना त्या मार्गावरून जाणाºया कोणत्याही बसमधून प्रवास करता येणार आहे. मात्र हे तिकीट रिझर्वेशनसारखे मानले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन महामंडळाकडून आलेल्या या योजनेबाबत पूर्व पहाणी व अभ्यास करण्यात आला असून १ सप्टेंबरपासून योजनेस प्रारंभ होणार आहे.एजंट ठरणार माहितीचे स्त्रोतही योजना प्रायोगिक तत्त्वावर असून, योजनेस अपेक्षितपणे चांगला प्रतिसाद मिळाला तर एजंटांची संख्या वाढवली जाणार असून नाशिक, रायगड याबरोबरच राज्याच्या इतर आगारांमध्येही योजना राबविली जाणार आहे. एजंटांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असून, बुकिंगबरोबरच ते प्रवाशांना बसचे लोकेशन, वेळ यांचीही माहिती देणार आहेत. याशिवाय एखाद्या प्रवाशाला इच्छित स्थळी जाण्यासाठी वारंवार गाड्या बदलाव्या लागणार असतील तर प्रवासाचा मार्ग, गावे, गाड्यांचे वेळापत्रक यांची सविस्तर माहितीही ते पुरविणार आहेत. प्रवाशांच्या मनातील शंका, प्रश्न यांचे निरसनही ते करणार आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहितीही ते प्रवाशांना देणार आहेत.