इंदिरानगर परिसरातील पडीक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:27 AM2020-12-03T04:27:23+5:302020-12-03T04:27:23+5:30

एक वर्षापूर्वी शीर व दोन्ही हात नसलेल्या एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह पैठणनगर येथील मोकळ्या मैदानातील पडीक विहिरीत आढळून आला ...

The question of waste wells in Indiranagar area is on the agenda | इंदिरानगर परिसरातील पडीक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर

इंदिरानगर परिसरातील पडीक विहिरींचा प्रश्न ऐरणीवर

Next

एक वर्षापूर्वी शीर व दोन्ही हात नसलेल्या एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह पैठणनगर येथील मोकळ्या मैदानातील पडीक विहिरीत आढळून आला होता. श्रद्धाविहार कॉलनी, पेठेकर मैदान, पेठेनगर रस्त्यावरील अभ्यासिकेशेजारी, शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकात रस्त्याचा मधोमध आदी विविध ठिकाणी पडीक विहिरी आहेत. या विहिरी बंदिस्त नसल्याने परिसरातील मोकाट जनावरे चरताना पाय घसरून विहिरीत पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. संबंधित मालकांनी किंवा महापालिका प्रशासनाने पडीक विहिरींना जाळ्या बसवून त्या बंदिस्त कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

---चौकट ----

परिसरातील काही नागरिक पडीक विहिरींमध्ये केरकचरा टाकत असल्याने घाण व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे

Web Title: The question of waste wells in Indiranagar area is on the agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.