नांदगाव:नांदगांव शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातील मुख्य रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक ठप्प होतांना दिसते. या कडे नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.नांदगांव शहरातील रेल्वे फाटका बाहेरील येवला रोड ४० गांव, औरंगाबाद रोड नांदगांव मालेगांव मनमाड रोड आदी रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी वैध आणी अवैध वाहने याच रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात त्यामुळे पादचारी व व इतर लहान मोठ्या वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होत असतो. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी असतात तर या वाहनावरील चालक मालक हे देखील रस्त्यावर गप्पा मारत उभे असतात कुणाच्या वाहनाचा धक्का लागला की त्याच्यावर तुटून पडतात.शहरातील रस्ते दुतर्फा लावण्यात आलेल्या दुचाकी वाहनांमुळे अरु ंद झाले आहेत. पायी चालणारा दोन दुचाकींच्या मधून कसाबसा कसरत करून पुढे जात असतो. महाराष्ट्र बँक, देना बँक व स्टेट बँकेसमोर लावण्यात येणारी दुचाकी वाहने बँकिंग वेळेत जणू हे रस्ते बंदच करून टाकतात.या शिवाय अवैध प्रवास वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या दोन्हीबाजुला उभी करून ठेवलेली असतात त्यामुळे तर वाहतुकीची मोठी कोंडी कायम होत असते यावर आता कारवाईची गरज आहे.
नांदगांव शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:47 IST
नांदगाव: नांदगांव शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून शहरातील मुख्य रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक ठप्प होतांना दिसते. या कडे नगरपरिषद व पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
नांदगांव शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर
ठळक मुद्देनांदगांव शहरातील रेल्वे फाटका बाहेरील येवला रोड ४० गांव, औरंगाबाद रोड नांदगांव मालेगांव मनमाड रोड आदी रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी वैध आणी अवैध वाहने याच रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात त्यामुळे पादचारी व व इतर लहान मोठ्या वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण