शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

प्रश्न फक्त बंडाचे नेतृत्व करण्याचा

By श्याम बागुल | Updated: January 30, 2019 12:51 IST

गेली अठरा वर्षे कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झालेले राजाराम पानगव्हाणे यांच्या काळात कॉँग्रेस केंद्रात व राज्यात सत्तेत होती, सत्तेचा लाभ जसा पानगव्हाणे यांना झाला तसाच तो जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनाही कमी, अधिक प्रमाणात झाला. परंतू ज्यावेळी सत्ता हातून गेली

ठळक मुद्देउरबडव्यांचे नेतृत्व कोणी करायचे यात एकमत होत नसल्याने शेवाळे यांच्या विरोधातील बंड तुर्त थंड शेवाळे यांच्या नियुक्तीच्या निर्णयातही राहूल गांधी यांचाच आदेश

श्याम बागुलनाशिक : निवड वा नियुक्ती कोणतीही असो त्यात वाद ठरलेले असतात, त्यातही जर राजकीय पक्षातील असेल तर विचारायला नको. अपवाद अखिल भारतीय कॉँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झालेल्या प्रियंका गांधीचा मानावा लागेल, परंतु त्यांची नियुक्ती जशी स्वकीयांना सुखावून गेली तशी त्यामुळे विरोधकांच्या पोटात भितीचा गोळाही उठवून गेली. नाशिक जिल्हा कॉँग्रेसच्या बाबतीत असेच काहीसे घडले. राजाराम पानगव्हाणे जिल्हाध्यक्ष नको म्हणून समस्त कॉँग्रेसजन एकमताने एकत्र आले परंतु त्यांच्या जागी कोण यावरून त्यांच्याच विसंवाद सुरू झाले, अशातच पक्षाने मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती केल्यामुळे त्याचा अनेकांना धक्का बसला. पानगव्हाणे नको इतपर्यंत ठीक परंतु तुषार शेवाळे यांची नेमणूक करताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगून विरोधकांनी उर बडवायला सुरूवात केली. मात्र या उरबडव्यांचे नेतृत्व कोणी करायचे यात एकमत होत नसल्याने शेवाळे यांच्या विरोधातील बंड तुर्त थंड झाले आहे.

गेली अठरा वर्षे कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झालेले राजाराम पानगव्हाणे यांच्या काळात कॉँग्रेस केंद्रात व राज्यात सत्तेत होती, सत्तेचा लाभ जसा पानगव्हाणे यांना झाला तसाच तो जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनाही कमी, अधिक प्रमाणात झाला. परंतू ज्यावेळी सत्ता हातून गेली त्यावेळी पानगव्हाणे यांना जिल्हाध्यक्षपद पेलने अवघड झाले, त्याच बरोबर अन्य पदाधिका-यांनाही पानगव्हाणे नकोसे झाले. सत्तेचा मलिदा कमी होताच, पक्षाकडे व संघटनेकडे दुर्लक्ष झाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कॉँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्याचे सारे खापर पानगव्हाणे यांच्यावर फोडून स्थानिक पदाधिकारी जसे नामनिराळे झाले, तसेच आजी-माजी आमदारांनीही आपली जबाबदारी झटकली. जिल्हा कार्यकारिणीतील नेमणूका असो वा तालुक्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती देताना पानगव्हाणे यांच्याकडून झालेला मानापमानाच्या गोेष्टींची जाहीर चर्चा घडवून आणण्यात आली. यासह अनेक कारणांनी पानगव्हाणे यांना पदावरून काढून टाकण्यासाठी एकवटलेल्या जिल्ह्यातील कॉँग्रेस पदाधिकाºयांना नवीन फेरबदलामुळे यश मिळाले असले तरी, तुषार शेवाळे यांच्या नियुक्तीने दु:खही तितकेच झाले आहे. पानगव्हाणे नको म्हणतांना एकत्र आलेल्या विरोधकांमध्ये पानगव्हाणे यांच्या उत्तराधिका-याबाबत एकमत होत नसल्यानेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या शेवाळे यांना पक्षश्रेष्ठींनी पसंती दिली. उच्चशिक्षीत, पक्षाशी एकनिष्ठ, संघटन कौशल्य अशी अंगी गुण बाळगणा-या शेवाळे यांची नियुक्तीही पानगव्हाणे विरोधकांना खटकली व त्यासाठी नेहमीप्रमाणे जमवाजमवही करण्यात आली. यात मालेगावच्याच काही कॉँग्रेसजनांनी पुढाकार घेतला व त्याला विद्यमान आमदाराने फूस दिल्याची चर्चा घडवून आणली. असंतृष्ठांच्या बैठकीचे नियोजनही करण्यात आले. जिल्हाध्यक्षपदाचा भार स्विकारण्यापुर्वीच सुरू झालेल्या पदाधिका-यांच्या सुंदोपसुंदीमुळे तुषार शेवाळे यांचा पदभाराचा कार्यक्रमही लांबणीवर टाकण्यात आला. परंतु ज्या प्रमाणे प्रियंका गांधी यांच्या सरचिटणीसपदाचा निर्णय पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी घेतला, तसाच शेवाळे यांच्या नियुक्तीच्या निर्णयातही राहूल गांधी यांचाच आदेश असल्याचा पक्ष श्रेष्ठींचा निरोप येताच बंडखोरांना आपल्या गंजलेल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या. आता शेवाळे हटावसाठी नवीन संधीचा शोध घेतला जाईल, प्रश्न या बंडखोरांचे नेतृत्व कोण करणार याचाच राहील.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस