शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या पेन्शन योजनेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:11 IST

दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याऐवजी त्यांना उपयुक्त ठरतील अशा भांडवली कामांवर भर देण्याचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला निर्देशित केल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेमार्फत दिव्यांगांसाठी प्रस्तावित पेन्शन योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेकडे या योजनेसाठी सुमारे ३५०० अर्ज प्राप्त झालेले आहेत.

नाशिक : दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून दिव्यांगांना वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याऐवजी त्यांना उपयुक्त ठरतील अशा भांडवली कामांवर भर देण्याचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला निर्देशित केल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेमार्फत दिव्यांगांसाठी प्रस्तावित पेन्शन योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेकडे या योजनेसाठी सुमारे ३५०० अर्ज प्राप्त झालेले आहेत. मागील वर्षी प्रहार संघटनेचे संस्थापक आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत आयुक्त कार्यालयात येत दिव्यांगांच्या प्रश्नासंबंधी जाब विचारत तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी अरेरावी करण्याबरोबरच हात उगारला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी दिव्यांगांसाठी युद्धपातळीवर विविध योजना राबवि ण्याचा एक कृती कार्यक्रमच हाती घेतला होता. त्यानुसार दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के राखीव निधीतून शहरातील दिव्यांगांना पेन्शन योजना सुरू करण्याचा विचार महापालिकेने केला होता. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाला देण्यात आल्या होत्या. महापालिकेने आॅगस्ट २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ६३७१ व्यक्तींना विविध प्रकारचे अपंगत्व असल्याचे समोर आले होते, तर १९३९ व्यक्तींकडेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र आढळून आले होते. सर्वेक्षणानंतरही महापालिकेकडे नोंदी होत राहिल्या. त्यामुळे दिव्यांगांची संख्या सात हजारांच्या आसपास जाऊन पोहोचलेली होती. दरम्यान, अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार अहमदनगर महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही दिव्यांगांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय प्रशासकीय स्तरावर होऊन त्याबाबतचे अर्ज वैद्यकीय विभागामार्फत मागविण्यात आले होते. त्यावेळी सुमारे ३५०० दिव्यांगांनी अर्ज दाखल केले होते. वैद्यकीय विभागाकडून सदर पेन्शन योजनेची फाईल लेखा परीक्षण विभागाकडे पाठविण्यात आलेली आहे. परंतु, अद्याप त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र, नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याऐवजी त्यांच्यासाठी भांडवली स्थायी स्वरूपाच्या आणि उपयुक्त ठरतील अशा योजना राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे पेन्शन योजनेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.दिव्यांगांच्या निधी खर्चाचे आदेशदिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिल्याचे समजते. दिव्यांगांसाठी उपयुक्त अशा उपक्रमांवरच भर देण्याचे नियोजन आहे. त्यात व्हीलचेअर्स, लिफ्टसारख्या योजनांचा समावेश आहे. दरम्यान, कुष्ठरोगी यांच्यासाठीही योजनांचा लाभ देण्याच्या सूचना आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका