कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथील तीन अल्पभूधारक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्याने सव्वातीन लाखांचा गंडा घातला असून, सदर व्यापारी द्राक्षमालाचे पैसे न देताच त्याने पोबारा केला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मौजे सुकेणे येथील संदेश प्रकाश मोगल व कसबे सुकेणे येथील नंदू दशरथ भंडारे, राहुल कारभारी भंडारे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास सव्वातीन लाख रुपये आग्रा येथील द्राक्ष व्यापारी रवींद्र गोस्वामी यांनी द्राक्ष प्लॉट सुरू केल्यानंतर दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून द्राक्षबाग अर्धवट सोडून पैसे न देता त्याने पोबारा केला आहे.त्यात अनुक्रमे संदेश मोगल द्राक्ष माल ६३ क्विंटल, भाव २,५५०, एकूण रक्कम १,६०,६५० रुपये, नंदू भंडारे द्राक्ष माल ५२ क्विंटल, भाव २,६०० एकूण रक्कम १,३५,२०० रुपये व राहुल भंडारे द्वारा माल ४० क्विंटल, भाव २,४५०, एकूण रक्कम १,१२.७०० रुपये, असा जवळपास तीन शेतकऱ्यांचा सव्वातीन लाख रुपयांचा माल घेऊन पलायन केले आहे. त्यापैकी त्याने संदेश मोगल या शेतकऱ्याला फक्त २० हजार रुपये गुगल पेद्वारे दिले आहेत.सदर द्राक्ष व्यापारी रवींद्र गोस्वामी हा मोटारसायकल (यूपी-८० एफएम- २१८६) वर येत होता. या द्राक्ष व्यापाऱ्यांविरोधात ओझर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.आग्रा येथील व्यापारी रोखीने पैसे देऊन द्राक्ष माल खरेदी करत होता; परंतु विक्रीत अडथळे येत आहेत. दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून पैसे न देताच त्याने पलायन केले. पिंपळगाव अडत ठिकाणाहून त्याची चौकशी होऊन आमचे पैसे मिळावेत, हीच अपेक्षा आहे.-संदेश मोगल, शेतकरीसर्व शेतकऱ्यांना यापूर्वीच आम्ही व्यापाऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्डच्या झेरॉक्स ताब्यात घ्याव्यात व चौकशीअंती द्राक्षबाग द्याव्यात, अशा सूचना केल्या आहेत. या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून व्यवहार करावेत. दोषी व्यापाऱ्यांची चौकशी केली जाईल.-अशोक रहाटे, पोलीस निरीक्षक
द्राक्ष उत्पादकांना सव्वातीन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:54 IST
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथील तीन अल्पभूधारक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत येथील ...
द्राक्ष उत्पादकांना सव्वातीन लाखांचा गंडा
ठळक मुद्देकसबे सुकेणे : पिंपळगाव येथील द्राक्ष व्यापाऱ्याचा पोबारा