शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाज सेवा समितीतर्फे गुणवंतांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:38 IST

बदलत्या काळानुसार समाजाची परिस्थितीही बदलली असून पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी असलेल्या अडचणी संपुष्टात आल्या असून शिक्षण घेण्यासाठी आता पुरेशा प्रमाणात पालकांचे पाठबळही मिळत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी योग्य फायदा करून घेत माहिती व तंत्रज्ञानाचा आपले ज्ञान व कौशल्यवृृद्धीसाठी पुरेपूर वापर करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी केले आहे.

नाशिक : बदलत्या काळानुसार समाजाची परिस्थितीही बदलली असून पूर्वीच्या काळी शिक्षण घेण्यासाठी असलेल्या अडचणी संपुष्टात आल्या असून शिक्षण घेण्यासाठी आता पुरेशा प्रमाणात पालकांचे पाठबळही मिळत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी योग्य फायदा करून घेत माहिती व तंत्रज्ञानाचा आपले ज्ञान व कौशल्यवृृद्धीसाठी पुरेपूर वापर करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांनी केले आहे.  माळी समाज सेवा समितीतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी बोलताना अनंता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करतानाच दूरदृष्टिकोन ठेवून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले, तर विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना सोशल मीडियाचा सावधपणे वापर करणे गरजेचे असून, पालकांनी आपल्या पाल्यांना सोशल मीडियावरील गैरप्रकारांपासून दूर ठेवण्याची गरज असल्याचे मत पोलीस जिल्हा उपअधीक्षक सचिन गोरे यांनी केले.  ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तम तांबे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, नगरसेवक संतोष गायकवाड, प्राचार्य दिनकर जानमाळी, उद्योजक चंद्रकांत बागुल, सुनील फरांदे यांच्यासह माजी नगरसेवक समाधान जाधव, राजेश सावंत, दौलतराव गांगुर्डे आदी उपस्थित  होते.  माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जागृती कोलगीकर यांनी केले. उत्तम बडदे यांनी आभार मानले.  यावेळी विविध क्षेत्रांतील यशवंतांसह पहिलीपासून ते उच्चशिक्षण क्षेत्रात चांगले गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या सुमारे सातशे विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक