Qualified students felicitate | गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
उमराणेत   गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्र माप्रसंगी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ. 

ठळक मुद्देयावेळी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, जि.प.शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, किशोर पवार, वैष्णवी देवरे आदिंनी मनोगत व्यक्त केले.


उमराणे : येथील शिव शंभो नित्य आरती सेवा समितीतर्फे विविध शालांत परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे माजी संचालक दिलीप केशव देवरे होते. सामाजिक कार्यकर्ते कैलास देवरे यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, जि.प.शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, किशोर पवार, वैष्णवी देवरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माप्रसंगी जि. प.शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला देवरे, वसंत बस्ते, विनोद पाटणी, माजी पोस्टमास्तर भावराव देवरे, सुनिल देवरे आदि उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी संदीप मोदी, संदीप हिरे, निंबा देवरे, भाऊसाहेब देवरे, योगेश साईनकर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन राजेंद्र निळकंठ देवरे यांनी केले. फोटो ओळ -


Web Title: Qualified students felicitate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.