शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्युआर कोड स्कॅनिंग फंडा; दहा रूपये देऊन हजारोे उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 15:21 IST

सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला ग्राहक भासवून शहरातील एकूण १८ व्यावसायिकांशी लॉकडाऊन काळात संपर्क साधला. त्यांच्या गुगल पे, फोन पे अ‍ॅपसारख्या युपीआय क्रमांकाच्या खात्यावर सुरूवातीला दहा रुपये पाठविले.

ठळक मुद्दे आपलेच दात अन् आपलेच ओठ...१८ व्यावसायिकांना एकूण ३ लाख ३७ हजार २४८ रुपयांचा गंडा

नाशिक : लॉकडाऊन काळात सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवत लोकांच्या बॅँक खात्यांवर डल्ला मारला. व्यवसाय ठप्प झाल्याने आॅनलाइन खरेदी-विक्रीला काही व्यावसायिकांकडून प्राधान्य दिले गेले. याचाच गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला विविध वस्तू खरेदी करायचे भासवून क्यु-आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडत शहरातील १८ व्यावसायिकांना एकूण ३ लाख ३७ हजार २४८ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात संशयित सायबर चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.लॉकडाऊन झाल्यापासून शहरात नव्हे तर संपुर्ण देशभरात सायबर गुन्हेगार अधिकच सक्रीय झाले आहे. स्वत: ला ग्राहक बनवून तर कधी आरोग्य विमा कंपनी, तर कधी बॅँक किंवा फायनान्स कंपनी प्रतिनिधी भासवून लोकांच्या बॅँक खात्यामधून रक्कम गायब करण्याचा सपाटा लावल्याचे आता समोर येत आहे. शहर सायबर पोलीस ठाण्याकडे मार्च ते जुलै या दरम्यान अशा विविध तक्रारी दाखल झाल्याने त्या तक्रारींनुसार आता पोलिसांनी एकत्रितपणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. काही दिवसांपुर्वीच ९५ नागरिकांना २३ लाखांना गंडा घातल्याचा असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात आॅनलाइन आर्थिक फसवणूक होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले.आपलेच दात अन् आपलेच ओठ...सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला ग्राहक भासवून शहरातील एकूण १८ व्यावसायिकांशी लॉकडाऊन काळात संपर्क साधला. त्यांच्या गुगल पे, फोन पे अ‍ॅपसारख्या युपीआय क्रमांकाच्या खात्यावर सुरूवातीला दहा रुपये पाठविले. व्यावसायिकांच्या बॅँक खात्यात दहा रुपये आल्याने त्यांना त्या सायबर गुन्हेगारांवर विश्वास बसला. त्याचा गैरफायदा घेत भामट्यांनी पुन्हा त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर थेट त्यांच्या बॅँक खात्याशी संलग्न असलेला क्यु-आर कोड पाठवून तो यांच्या पेमेंट अ‍ॅपद्वारे स्कॅन करण्यास सांगितला. मुळात तो ‘क्युआर’ पैसे स्विकारण्याचा होता. दोन हजारांपासून दहा हजारांपर्यंत प्रत्येकी व्यावसायिकाची फसवणूक झाली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीbusinessव्यवसाय