शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पप्रेमींनी फुलले राजीव गांधी भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:19 IST

महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनात नाशिककरांची रविवारी (दि.२४) अलोट गर्दी लोटल्याने परिसर फुलला होता. पुष्पोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुष्पप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने रात्री १० वाजेपर्यंत परीसर गजबजलेला होता.

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनात नाशिककरांची रविवारी (दि.२४) अलोट गर्दी लोटल्याने परिसर फुलला होता. पुष्पोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुष्पप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने रात्री १० वाजेपर्यंत परीसर गजबजलेला होता. यावेळी पुष्पोत्सवामधील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.महापालिकेच्या वतीने शरणपूररोडवरील राजीव गांधी भवन येथे भरविलेल्या तीन दिवसीय पुष्पोत्सवाचा उत्स्फूर्त गर्दीने समारोप झाला. याप्रसंगी विजेत्यांचा गौरव करण्यात आला. आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर रंजना भानसी, मिसेस ग्लोबल डॉ. नमिता कोहोक, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक वर्षा भालेराव, वैशाली भोसले, मुकेश शहाणे, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले आदी मान्यवर उपस्थित होते.कोहक म्हणाल्या, की जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाचा फुलांशी संबंध येतो. फुलांसोबत प्रत्येकाचे अतुट नाते असते. या रंगीबेरंगी दुनियाची सफर नाशिककरांना पुन्हा प्रशासनाने घडविल्याचा आनंद झाला. माझ्या आजारपणाच्या कालावधीत मला ‘निशीगंधा’ या फुलाचा मोठा आधार लाभला. पुष्पोत्सवाच्या निमित्ताने नाशिककरांची झालेली अलोट गर्दीने मनपा मुख्यालयाला जणू फुलांच्या जत्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याचे कोहोक यांनी यावेळी सांगितले.गमे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, महापालिकेच्या वतीने ‘देवराई’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत ३१ मोकळ्या भूखंडांवर भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करुन संवर्धन केले जाणार आहे. यामुळे शहराचे पर्यावरण संतुलन टिकून राहण्यास मदत होईल.असे आहेत विजेतेसोनाली काठे (गुलाबपुष्प गट), सागर मोटकरी (पांढरा गुलाब), बाबुलाल नर्सरी (फळे-भाजीपाला), आनंद बोरा (गुलाबपुष्प), पपर्या नर्सरी (हंगामी फुले), अंकुर महापात्रा (मोसमी फुले), सुकदेव महापात्रा, सरोज कॅक्टस (कुंडीतील शोभीवंत वनस्पती), पुष्परचना-खुला गट- अश्विनी शिरोडे, स्वप्नाली जडे, शालेय गट-सोनी साळवे सानिका जिंतूरकर, जपानी पुष्परचना व ताज्या फुलांची आकर्षक रचना-स्वप्नाली जडे, सुनीता जडे, शुष्क काष्ट पुष्परचना-स्मृती जिंतुरकर, स्वप्नाली जडे, सुनीता जडे, पुष्प रांगोळी-पूजा बेलदार, मनीषा सालकाडे, पुष्पहार-वर्षा पाटील, निकिता पाटील, पुष्पगुच्छ-विश्वकर्मा डेकोरेटर्स, माधुरी लढ्ढा, फळे-भाजीपाला-कच्च्या भाज्यांची सजावट- प्रज्ञा चव्हाणके, पंकजा जोशी, पल्लवी बोराडे (निंबध), मनीषा पूरकर, साक्षी बोराडे (कविता).

टॅग्स :Nashikनाशिक