शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सत्ताधिकाऱ्यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:28 IST

मलनिस्सारण व्यवस्थेतील कामकाज बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून करताना सहा विभागात सहा ठेकदारांमार्फत करण्याऐवजी संपूर्ण शहरासाठी एकच ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने नाकारल्यानंतर तो प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला.

नाशिक : मलनिस्सारण व्यवस्थेतील कामकाज बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून करताना सहा विभागात सहा ठेकदारांमार्फत करण्याऐवजी संपूर्ण शहरासाठी एकच ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने नाकारल्यानंतर तो प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला. त्यानंतर महापौरांनी त्यासंदर्भात राज्य शासनाकडे बाजूही मांडली. परंतु अखेरीस महासभेचा प्रतिकूल ठराव रद्द करून स्थानिक सत्ताधिकाऱ्यांना धक्का दिला आहे.महापालिकेच्या या मलनिस्सारण व्यवस्थेअंतर्गत मलनिस्सारण व्यवस्था, मलनिस्सारण केंद्र व मलजल उपसा केंद्र यांची देखभाल तसेच दुरुस्ती बाह्य यंत्रणेमार्फत करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडला होता. मात्र, त्यावेळी खासगीकरण नको अशी भूमिका पदाधिकारी मांडत होते. त्यातच मुंढे यांनी मलनिस्सारणाच्या कामांसाठी एकच ठेकेदार नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडल्यावर महासभेत त्यास अपेक्षेप्रमाणेच विरोध झाला व प्रचलीत पध्दतीनेच विभागनिहायच काम सुरू ठेवावा असा ठराव १९ जुलै २०१८ रोजी झालेल्या महासभेत करण्यात आला होता. त्यासंदर्भात मुंढे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून महासभेचा हा ठराव विखंडित करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात मुंढे यांनी २३ आॅगस्ट रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर १२ आॅक्टोबर रोजी नगरविकास खात्याने महासभेने केलेला ठराव निलंबित केला होता. मात्र त्यावर बाजू मांडण्याची संधी दिली जाते. यासंदर्भात महापौर रंजना भानसी यांनी आपली बाजू मांडण्याचे काम म्हणजेच अभिवेदन गेल्यावर्षी १३ डिसेंबर रोजी केले होते. मात्र, राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या परिपत्रकान्वये शक्य तेथे पदनिर्मिती न करता बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्याचे सूचित केले आहे.बाह्य यंत्रणेची गरजचमनपाच्या वतीने प्रति दिन ३९० दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्याद्वारे तयार होणारे सांडपाणी १५९४ किलोमीटर लांबीच्या मलवाहिकांद्वारे संकलित करून शहरातील विविध मलनिस्सारण केंद्रांमध्ये पाठविण्यात येते. याशिवाय मनपाच्या वतीने मलवाहिकांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन कामे तसेच तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बाह्य यंत्रणेची गरज असल्याचे शासनाने नमूद केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाGovernmentसरकार