शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भक्ष्याचा पाठलाग : भूक भागविण्यासाठी धावणारा बिबट्या नाशिकमध्ये पडला विहिरीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:19 IST

क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले.

ठळक मुद्देवनकर्मचा-यांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले.बिबट्याच्या प्रकृतीची तपासणी बिबट्या पाच ते सहा वर्षांचा नर

नाशिक : जिल्ह्यातील बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाडमधील गोदाकाठाच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गोदाकाठालगत ऊसशेती, गहू, मकाची शेती असल्यामुळे या भागात बिबट्यांचा अधिवास वाढला आहे. शनिवारी पहाटेपाच वाजेच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना नर बिबट्या शेतातील उघड्या विहिरीत कोसळला.निफाड तालुक्यातील तारुखेडले गावाच्या शिवारातील संतोष रामचंद्र शिंदे यांच्या गट क्रमांक १६मधील शेतीमध्ये विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता आढळून आले. पीकांना पाणी देण्यासाठी शिंदे हे नेहमीप्रमाणे विहीरीजवळ पोहचले असता बिबट्याची डरकाळी त्यांच्या कानावर पडली. त्यांनी विजेरीच्या सहाय्याने विहिरीत बघितले असता बिबट्याचे डोळे चमकले. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी तांबड फुटण्याची प्रतीक्षा करत सर्व आवश्यक साहित्याची जमवाजमव करत वाहन सज्ज केले. पहाट उजाडताच वाहनासह वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी. वनरक्षक व्ही.आर.टेकनर, विसापूर सोनवणे, वनसेवक व्ही.एस.लोंढे, भय्या शेख, दत्तू आहेर, मधुकर शिंदे आदिंनी घटनास्थळ गाठले. क्रेनच्या साहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. यावेळी विहिरीच्या पाण्यातून धडपणारा बिबट्या अलगद पिंज-यात येऊन बसला आणि झडप पडल्याने पिंजरा बंदिस्त झाला. क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचा-यांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ. चांदोरे यांनी बिबट्याच्या प्रकृतीची तपासणी केली. हा रेस्क्यू केलेला बिबट्या पाच ते सहा वर्षांचा पुर्ण वाढ झालेला असून नर जातीचा आहे.

जनजागृती करणार; लवकरच निफाड परिसराचा पाहणीदौरालवकरच निफाड परिसरातील गोदाकाठ भागाचा पाहणीदौरा करणार आहे. येथील शेतक-यांसोबत संवाद साधून त्यांना विहिरी सुरक्षित करण्याबाबत जनजागृती करणार आहे. या भागात शेती व ऊस, मका, गहू यासारख्या पीकांचे बारामाही उत्पादनामुळे बिबट्यांचा वावर आहे. त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होत आहे. नागरिकांनी स्वत:सह पशुधनाची खबरदारी घ्यावी. शक्यतो बिबट्याच्या हालचाली संध्याकाळपासून गतीमान होतात. त्यामुळे नागरिकांनी संध्याकाळनंतर शेतीच्या परिसरात जाणे टाळावे. या भागात जनजागृतीसाठी ‘जाणता वाघोबा’ नावाचे अभियान सुरूच आहे. यामाध्यमातून बिबट्याचे जीवशास्त्र नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न वन्यजीवांवर अभ्यास करणाºया सामाजिक संस्थेकडून होत आहे.- डॉ. शिवबाला एस., उपवनसंरक्षक नाशिक पुर्व

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागleopardबिबट्याwildlifeवन्यजीव