सिन्नर : सन २०१६-१७च्या सेस निधीतून करण्यात आलेली कामे व पंचायत समितीत खरेदी केलेले साहित्य ज्यादा दराने विकत घेतल्याच्या बाबीची चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप करीत भाजपाच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकून सभात्याग करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला. गेली मासिक बैठक सेस निधीतून ज्यादा दराने साहित्य खरेदी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून गाजली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सात लाख ३२ हजार ८५२ रुपयांच्या खर्चावर आक्षेप नोंदविण्यात आला. तीन बाबींचा खर्च मंजूर करत खरेदी साहित्याची पाहणी करण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला होता. मात्र पाहणीसाठी भाजपाच्या सदस्यांना बोलविण्यात आले नसल्याचा आरोप भाजपाच्या सदस्यांनी केला. या निषेधार्थ भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, योगीता बाबासाहेब कांदळकर व तातू जगताप यांनी सभात्याग केला. त्यानंतर शिवसेनेच्या उपसभापती वेणूबाई डावरे, सदस्य जगन्नाथ भाबड, भगवान पथवे व संगीता पावस यांच्या उपस्थितीत विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे यांच्या अनुपस्थितीत उपसभापती वेणूबाई डावरे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठकीस प्रारंभ झाला. गटविकास अधिकारी नंदकुमार वाणी यांनी गेल्या सभेचे इतिवृत्त वाचून ते कायम करण्यासाठी सभागृहाची परवानगी मागितल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.
साहित्य खरेदी : चौकशी झाली नसल्याचा आरोप सिन्नरला भाजपा सदस्यांचा सभात्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:17 IST
सिन्नर : सन २०१६-१७च्या सेस निधीतून करण्यात आलेली कामे व पंचायत समितीत खरेदी केलेले साहित्य ज्यादा दराने विकत घेतल्याच्या बाबीची चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप करीत भाजपाच्या सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकून सभात्याग करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
साहित्य खरेदी : चौकशी झाली नसल्याचा आरोप सिन्नरला भाजपा सदस्यांचा सभात्याग
ठळक मुद्देज्यादा दराने साहित्य खरेदी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून गाजली विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला