शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नियम न पाळणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:06 IST

मालेगाव : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सतर्क राहून आरोग्य प्रशासनाचे नियम पाळावेत. प्रशासनाने दिलेले नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

ठळक मुद्देमालेगाव। आरोग्यसेवेचा आढावा; कोरोनावरील उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सतर्क राहून आरोग्य प्रशासनाचे नियम पाळावेत. प्रशासनाने दिलेले नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.मालेगाव शहरासह ग्रामीण भागात गेल्या आठवड्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आढावा बैठक झाली यावेळी मंत्री भुसे बोलत होते.यावेळी मंत्री भुसे म्हणाले,की वाढत्या रुग्णसंख्येमध्ये बहुतांश रुग्ण हे पश्चिम भागासह ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यासाठी एम.एस.जी.कॉलेजमधील कोवीड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात यावे. औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी महापालिकेने तत्काळ उपाययोजना कराव्यात. रुग्णांना गृहविलगीकरणाची मुभा देतांना त्यांना आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मानवतावादी दृष्टीकोनातून रुग्णावर उपचार झाला पाहिजे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. उपचाराशिवाय एकही रुग्ण वंचित राहता कामा नये असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. त्याच बरोबर शहरातील रस्त्यालगत असलेल्या विक्रेत्यांनी विशेष काळजी घेवून दिलेल्या सुचनांचे पालन करावे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमीत मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हातांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस व डॉ.हितेश महाले यांनी तालुक्यातील आरोग्य प्रशासनामार्फत राबविण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती दिलीबैठकीला घटना व्यवस्थापक तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, पोलीस उपअधिक्षक शशिकांत शिंदे, डॉ.हितेश महाले, डॉ.सपना ठाकरे उपस्थित होते. नांदगाव तालुक्यात सुसज्ज कोरोना सेंटर सुरू करामनमाड : नांदगाव तालुक्यात आॅक्सिजनसह सुसज्ज कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मनमाड येथे आयोजित नांदगाव व येवला तालुक्याच्या विभागीय कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, खासदार डॉ. भारती पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आमदार सुहास कांदे, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, पंकज भुजबळ, राजाभाऊ अहिरे आदी उपस्थित होते. वाढती रु ग्णांची संख्या व त्याबाबत संबंधित घटकांनी सुरू केलेली उपाययोजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. रु ग्णसंख्या कमी होत आहे म्हणून दुर्लक्ष करू नका. मनमाड शहर महत्त्वाचे केंद्र असून, येथे नागरिकांचे आगमन मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे कोविडच्या कामांना प्राधान्य द्या अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या.

टॅग्स :Malegaonमालेगांवcorona virusकोरोना वायरस बातम्या