शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत १०२ विनामास्क कामगारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:12 IST

 चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागाने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णात वाढ झाल्याची बाब समोर  आली आहे.  दरम्यान गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अकस्मात एका कंपनीस  भेट देऊन विनामास्क वावरणाऱ्या १०२  कामगारांवर प्रत्येकी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. 

ठळक मुद्देवाढत्या रुग्णसंख्येने नागरिकांत चिंता

घोटी :  चार दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य विभागाने चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढविल्याने रुग्णात वाढ झाल्याची बाब समोर  आली आहे.  दरम्यान गटविकास अधिकारी, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने अकस्मात एका कंपनीस  भेट देऊन विनामास्क वावरणाऱ्या १०२  कामगारांवर प्रत्येकी २०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली असून कोरोना रोखण्यासाठी घालण्यात येणाऱ्या बंधनांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात आठवडे बाजार, तसेच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवशीही जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने वगळता अन्य दुकाने , व्यवहार व आस्थापने बंद राहत असल्याने मजुरी, रोजगार आदींचा प्रश्न निर्माण होत आहे. चार दिवसांपासून तालुक्यात अचानक रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यातही सर्वच गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुरु झाल्या आहेत. घोटी, इगतपुरी, कांचनगाव, टाकेद आदी ठिकाणी तसेच ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येत असल्याने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.तालुका आरोग्य प्रशासनाने गेल्या आठवडाभरात जवळपास एक हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. त्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ८१ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत असून काही रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.वीस हजारांचा दंड वसूलगटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, भरत वेंदे, घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि.१८) तालुक्यातील जिंदाल कंपनीत जाऊन नियमांच्या अंमलबजावणीची तपासणी केली असता अनेक कामगार विनामास्क वावरत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. या बाबीची दखल घेत १०२ कामगारांना प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे वीस हजार चारशे रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पळे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस