शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पगार कपातीची महापालिका कर्मचाऱ्यांना ‘शास्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:43 IST

नाशिक : कोरोना संचारबंदीमुळे उद््भवणा-या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून महापालिकेने शासनाच्या आदेशाचा आधार घेत अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले. मात्र तसे करताना वेतनचिठ्ठीवर बिनपगारी असा उल्लेख करण्यात आल्याने मात्र कर्मचारी नाराज झाले आहेत. बिनपगारी हा शब्द कर्मचाºयांवरील कारवाई संदर्भात वापरला जात असल्याने कर्मचाºयांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे, तर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने हा शब्द सेवापुस्तिकेत घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

नाशिक : कोरोना संचारबंदीमुळे उद््भवणा-या आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून महापालिकेने शासनाच्या आदेशाचा आधार घेत अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन कमी केले. मात्र तसे करताना वेतनचिठ्ठीवर बिनपगारी असा उल्लेख करण्यात आल्याने मात्र कर्मचारी नाराज झाले आहेत. बिनपगारी हा शब्द कर्मचाºयांवरील कारवाई संदर्भात वापरला जात असल्याने कर्मचाºयांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे, तर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने हा शब्द सेवापुस्तिकेत घेऊ नये, अशी मागणी केली आहे.कोरोना संकट उद््भवल्यानंतर गेल्या महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केले. नंतर ते वाढवून ३ मेपर्यंत केले आहे. त्यामुळे महापालिकेला ऐन मार्चअखेरीस अनेक करांची वसुली करता आली नाही, तर नगररचना विभागाचे उत्पन्न कम्पांडिंगमुळे सहज वाढत असतानाही त्यालाही ब्रेक बसला. दरम्यान, राज्य शासनाने कर्मचाºयांच्या वेतनात श्रेणीनिहाय कपात करण्याचे संकेत दिले. त्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर दोन टप्प्यांत वेतन अदा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.नाशिक महापालिकेने शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने मार्च पेड इन एप्रिल महिन्याचे वेतन करताना वर्ग १ व २ च्या कर्मचाºयांना ५० टक्के, वर्ग ३ च्या कर्मचाºयांना ७५ टक्के, तर वर्ग ४ मधील सर्व कर्मचाºयांना १०० टक्के वेतन अदा केले. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणाचा विरोध नाही. मात्र वर्ग तीनमधील सुमारे आठशे कर्मचाºयांच्या वेतन चिठ्ठीवर बिनपगारी असा उल्लेख आहे. शासनाच्या निर्देशानुसार वेतनातील कपात म्हणजे शास्ती किंवा कारवाई नाही. परंतु बिनपगारी ही चुकीच्या कामाबद्दल शास्ती समजली जाते. त्यामुळे प्रशासन उपायुक्तांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे आणि सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात कर्मचाºयांचे सात दिवसांचे वेतन कपात करताना बिनपगारी असा उल्लेख असल्याने त्याविषयी संभ्रम निर्माण झाला असून, शासनाच्या आदेशानुसार दोन टप्प्यांत वेतन देय असल्याने सदरच्या बिनपगारी रजेची नोंद अधिकारी आणि कर्मचाºयांच्या सेवापुस्तकात नोंद घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक