शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडला ‘मांजरपाडा’

By admin | Updated: May 30, 2016 00:36 IST

येवला : सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे जलसंपदामंत्र्यांचे उद्दिष्ट

येवला : निधीअभावी रखडलेले राज्यातील प्रकल्प निधी देऊन पूर्ण केले जातील व सिंचन क्षमतेत वाढ करण्याचे जलसंपदा खात्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितल्याने येवला तालुक्याच्या अस्मितेचा मांजरपाडा प्रकल्प आता मार्गी लागणार काय, अशा आशयाची जोरदार चर्चा तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात सरू झाली आहे. हा प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. सुरगाणा तालुक्यातील केम पर्वतरांगामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे ६०६ दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याची महत्त्वाकांक्षी मांजरपाडा वळण योजनेचे काम सध्या ठप्प झाले आहे. जलसंपदा व नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही मांजरपाडा-१ वळण योजनेबाबत आता थेट कार्यवाहीसाठी प्रयत्न करावेत आणि येवला तालुकावासीयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे..मांजरपाडा-१ वळण योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ४५४ कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. तसेच आघाडी शासनाने मंजूर केलेले सन २०१४-१५ साठीचे ७० कोटी रुपयांचे अनुदान प्रशासकीय मान्यतेअभावी अखर्चित राहिले आहे. त्यामुळे त्यातील २८ कोटीचा निधी गोदावरी महामंडळाने इतर प्रकल्पासाठी वळविला आहे. २०१४-१५ च्या मंजूर अनुदानाला २०१५-१६ मध्ये खर्च करण्यासाठी विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे. आता युती सरकारकडे मांजरपाडा वळण योजनेसाठी ४५४ कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत लालफितीत अडकलेला प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा आहे. येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागाच्या या प्रकल्पाचे केवळ ७५० मीटर एवढ्या लांबीच्या बोगद्यासह काही पूल व अल्पखर्चाची कामे बाकी आहेत. येवल्याच्या उत्तरपूर्व भागात थेट डोंगरगावपर्यंत पाटातून पाणी पाहण्यासाठी तीन पिढ्या खपल्या आहेत. मांजरपाड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली. श्रेयवादासह राजकीय लढाई निवडणुकीत राजकीय पक्षांनी जरूर खेळावी, पण तालुक्याच्या या पाणीप्रश्नावर तत्काळ निर्णय घ्यावा. येवला शहर व तालुका भारतीय जनता पक्षाने या कामात आता सारे कौशल्य पणाला लावावे अशी अपेक्षा आहे. सत्तेत नसताना भाजपानेदेखील हा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून भाषणबाजी केली आहे. आता मात्र निर्णायक लढ्यात उत्तरपूर्व भागात पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे.पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे जनक स्व. आमदार जनार्दन पाटील यांनी जीवनभर उत्तरपूर्व भागात पाणी यावे म्हणून अथक परिश्रम घेतले आहेत. मांजरपाडा वळण बंधाऱ्याचे बोगद्याचे गेले दोन वर्षांपासून बंद असलेले काम तत्काळ सुरु व्हावे, कृती समितीदेखील सध्या अस्तित्वात आहे. येवल्याचे आमदार छगन भुजबळ तसेच संतु पाटील झांबरे, विठ्ठल शेलार, तात्यासाहेब लहरे, देवचंद पाटील, बद्रीनाथ कोल्हे, भाऊ लहरे, सुनीता जनार्दन पाटील-पालवे, दादा पाटील नेहे, भाऊ लहरे, संजय पगारे, रामभाऊ घोडके, प्रकाश जानराव, विठ्ठल बोरसे, प्रकाश निकम, जगन्नाथ भोसले, रावसाहेब खैरनार, विठ्ठल दारूंटे, दिनकर जेजुरकर, विष्णू कुलधर, हिरालाल घुगे, संजय सोमासे, लक्ष्मण कदम, श्रीराम पाटील शिंदे, लक्ष्मण पाटील, गोवर्धन पाटील, खंडू खैरनार, एकनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर शेलार, उस्मान शेख, शिवाजी धनगे, कुसमडीचे सरपंच रामदास महाले, भीमा पवार, साईनाथ येवला, नवनाथ महाले, भाऊसाहेब शेजवळ, प्रकाश साठे, एकनाथ पवार, सोपान बारहाते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जनजागृती, आंदोलने, मोर्चे, वेगवेगळ्या प्रकारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मांजरपाडा प्रकल्प मार्गी लागावा म्हणून येवला तालुक्यात जनआंदोलनाचा रेटा सुरूच आहे. गेल्या ४० वर्षांपासून तालुक्याच्या अवर्षणप्रवण डोंगरगावपर्यंत पाणी पोहचविण्याबाबत भिजत पडलेला मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लोकप्रबोधानातून चळवळ उभी व्हावी व सत्ता बदलो अथवा स्थिर राहो पाणीप्रश्न सुटून मांजरपाडा प्रकल्प पूर्ण व्हावा या हेतूने शेतकऱ्यांत जागृती करण्याच्या उद्देशाने आंदोलने चालूच आहेत. या प्रश्नासाठी तालुक्यातून मुख्यमंत्र्यांना पाच हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनीताताई पाटील- पालवे यांनी केला आहे. पुणेगाव धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी पुरेसे असणार नाही म्हणून तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांजरपाडा धरण व वळण बंधारे बांधण्याची योजना निर्माण करून गुजरातकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी पुणेगाव धरणात आणण्यासाठी बोगद्याचे काम हाती घेतले. पुणेगाव धरणात पाणीसाठा वाढविण्यासाठी नवीन वळण बंधाऱ्यांच्या कामांचे नियोजन केले. आजमितीस बोगद्याचे काम ८६ टक्के पूर्ण झालेले आहे. धरण सांडव्याचे काम ६५ टक्के पूर्ण झालेले आहे. पालकमंत्र्यांनी लक्ष घालून उर्वरित कामाला गती द्यावी, असे तालुकावासीयांचे म्हणणे आहे.(वार्ताहर)