लासलगाव : येथून जवळच असलेल्या देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर गावातील महिलांनी बुधवारी सकाळी खुलेआम स्वस्त दरात देशी व विदेशी दारूविक्रीचे दुकान थाटून गांधीगिरी करत अनोखे आंदोलन केले. अनेकवेळा मागणी करूनही गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध धंद्यांवर कारवाई करू न शकलेल्या पोलीसांनी या दूकानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. गावातील अवैध दारू विक्री तातडीने कायमस्वरूपी बंद करा या मागणीकडे लासलगावचे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात अवैध दारू विक्र ी व मटका बंद होण्यासाठी महिलांनी आज ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर खुले आम स्वस्त दरात देशी व विदेशी दारूची विक्र ीचे दुकान थाटले. त्यानंतर अवैध दारू विक्री तातडीने कायमस्वरूपी बंद करावी या मागणीचे निवेदन तलाठी एन. ए. गायकवाड यांना देण्यात आले. अवैध धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी महिलांनी दिला. लासलगाव पोलिसांना अवैध दारू विक्र ी व मटका बंद करण्याच्या मागणीची निवेदने ग्रामस्थांनी वारंवार देऊनही त्यावर साधी कारवाई झाली नाही. त्याच्या निषेधार्थ आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी स्वस्त दारात दारू विक्र ीचे दुकान थाटले. या आंदोलनात पिडीत महिलांनी दारूच्या व्यसनामुळे आपल्या कुटुंबाचे होणारे हाल सांगत तीव्र भावना व्यक्त केल्या.(वार्ताहर)
खुलेआम मद्यविक्रीच्या दुकानाकडे पोलिसांची पाठ
By admin | Updated: February 3, 2016 23:20 IST