नाशिक : डॉ. विक्रम शहा लिखित भक्ताभर स्तोत्रचा प्रकाशन सोहळा धुळे येथील इतिहास संशोधक डॉ. गजकुमार शहा यांच्या हस्ते उंटवाडी रोडवरील इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग हॉलमध्ये संपन्न झाला.यावेळी शहा म्हणाले की, सातव्या शतकापासून तर आत्तापर्यंत जैन धर्म टिकून राहिला असून, हे स्तोत्र १८ भाषेत अनुवादित झाले आहे. यावेळी उपस्थितांचे प्रास्ताविक डॉ. विक्रम शहा यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून असलेले विराज बिल्डर्सचे संचालक राजेंद्र शहा, अशोकाचे संचालक सतीश पारख आदी उपस्थित होते. याप्रसंगी दिनेश पैठणकर, विलास पोतदार यांचा सत्कार करण्यात आला. आभार रंजनभाई शहा यांनी मानले. कार्यक्रमास शैलेश शहा, विलास शहा, शरद शहा, प्रफुल्ल शहा, गौतम सुराणा, अनिल नहार, डॉ. पुष्कर पटणी, अॅड. अभय बोरा, मिलिंद पटवा आदी उपस्थित होते.
विक्रम शहा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:18 IST