शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या स्थापनेकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:42 IST

सायखेडा : गणरायाची स्थापना करण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळ क्रि याशील असतात. लोकसहभागातूनअनेक ठिकाणी तरु ण एकत्र येऊन वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधनात्मक काम करण्यासाठी गणरायाची स्थापना करत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने त्याचा परिणाम गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांवर देखील झाला आहे. ग्रामीण भागातही सध्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवाची स्थापना न केल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देआर्थिकटंचाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार

सायखेडा : गणरायाची स्थापना करण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळ क्रि याशील असतात. लोकसहभागातूनअनेक ठिकाणी तरु ण एकत्र येऊन वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधनात्मक काम करण्यासाठी गणरायाची स्थापना करत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने त्याचा परिणाम गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांवर देखील झाला आहे. ग्रामीण भागातही सध्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवाची स्थापना न केल्याचे दिसून आले आहे.22 मार्च पासून देशभरातील सर्वच धार्मिक स्थळ बंद आहेत. अनेक मंदिरांमध्ये लाखो रु पयाची उलाढाल होत असताना अशी मंदिरही सरकारने बंद केली आहे. अजूनही कोरोनाचे संकट दूर होत नाही अशी परिस्थिती असल्याने गणेश उत्सवावर त्याचा परिनाम अदिसून येत आहे. गणेशोत्सव मंडळांची पंधरा दिवस गणेश स्थापनेसाठी लगबग सुरू असते. सामाजिक देणारा देखावा उभा करणे, रोषणाई निर्माण करणे, सरकारी परवानग्या काढणे अशा कामांची लगबग सुरू असते. मात्र यंदा कोरोनाची भीती व पोलिसांनी परवानगी नाकारल्याने उत्सहावर विरजन पडले असून अनेकांनी घरगुती उत्सव साजरा करण्यासच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेश स्थापनेकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय गणेश उत्सव मंडळ ही त्यांच्या देणगीवर सर्व खर्च भागवत असतात. यंदा अनेक छोटे मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अनेक व्यवसायिक आर्थिक टंचाईचा सामना करत आहेत. दुकाने अनेक महिने बंद असल्यामुळे वर्गणी देण्याची मानिसकता दुकानदारांमध्ये नसल्याने वर्गणी उभी कशी करावी असा प्रश्नही सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकार्यांना पडला होता. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेश स्थापना पासून चार हात दूर राहण्याचा निर्णय अनेक मंडळींनी घेतला असून, घरगुता स्थापनेलाच महत्त्व दिले आहे.चौकटकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन करणे धोक्याचे होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये गणेश स्थापना करण्याचे नियोजन केले.सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता कोरोना संकट दूर होण्यासाठी गणरायाला घरातून विनवणी करणार आहोत.- गणेश मोगल, अध्यक्ष शिवरु द्र फ्रेंड सर्कल

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिस