शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

सार्वजनिक गणेशोत्सव रंगात  : धार्मिक देखाव्यांवर मंडळांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:57 IST

सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला असताना शहरात रविवारी (दि.१६) संध्याकाळी गणेश मंडळांची आरास, देखावे बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने कुटुंबीयांसह घराबाहेर पडल्याने गर्दी उसळली होती.

नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला असताना शहरात रविवारी (दि.१६) संध्याकाळी गणेश मंडळांची आरास, देखावे बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने कुटुंबीयांसह घराबाहेर पडल्याने गर्दी उसळली होती. जुने नाशिक, पंचवटी, कॉलेजरोड परिसरात मंडळांनी धार्मिक-सामाजिक विषय देखाव्यांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.गणेशोत्सवाचा रविवारी तिसरा दिवस जरी असला तरी पुढच्या रविवारी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव काळात एकच रविवार येत असल्याने भाविक घराबाहेर पडले होते. पुढच्या चौथ्या शनिवारची शासकीय सुटीच्या निमित्ताने विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गर्दी होण्याची शक्यता आहे. रविवार कारंजा येथील गणेश मंडळाने अष्टविनायक दर्शनाचा देखावा उभारला आहे. तसेच नामकोच्या धनवर्धिनी शाखेने नेहरू उद्यानाजवळ महाभारतातील भगवान श्रीकृष्णाच्या विराट रूप दर्शनाचा देखावा साकारला आहे. तसेच घनकर गल्लीमधील नवप्रकाश-सूर्यप्रकाश मित्रमंडळाने सुमारे २१ फूटी गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा राज महालात केली आहे. ही मूर्ती ‘नाशिकचा राजा’ म्हणून ओळखली जाते. शिवमुद्रा मित्रमंडळाने अशोकस्तंभ येथे आकर्षक २८ फुटी मानाच्या राजाची गणेशमूर्ती साकारली आहे. मेनरोड येथील गाडगे महाराज पुतळ्याजवळ शिवसेवा युवक मित्रमंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईच्या देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. रामवाडी येथील विक्रांत युवक मित्रमंडळाने श्रीकृष्ण रासलीलेचा देखावा सादर केला आहे. मालेगाव स्टॅन्ड मित्रमंडळाने संत गोरोबा यांचा देखावा सादर केला आहे. सरदार चौक मित्रमंडळाने नृसिंह देखावा उभारला आहे. काळाराम मंदिराच्या परिसरात मंडळाने विठूमाउलीच्या दिंडीसोहळा थाटला आहे. पंचवटीमधील भगवती मित्रमंडळाने संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवितानाचा देखावा,पंचवटी कारंजा मित्रमंडळाने येथे कृष्णलीला, गुरुदत्त मित्रमंडळाने रावण वधाचा देखावा सादर केला आहे. भडक दरवाजा मित्रमंडळाने धोकादायक सेल्फीविषयीचा प्रबोधनपर देखावा मांडला आहे. तसेच श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाने भगवान विष्णूचा देखावा, साई तिरंगा मित्रमंडळाने भगवान शंकराची विराट मूर्तीचा देखावा, रामकुंडावर आदिवासी जीवरक्षक मंडळाने भगवान दत्त यांच्या मूर्तीचा देखावा सादर केला आहे. त्याचप्रमाणे बी. डी. भालेकर मैदानावरही विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखावे उभारले आहेत. यामध्ये बॉश मंडळाने मोठा महाल साकारला आहे. एमएसएल मंडळाने दिंडीचा देखावा, मायको मंडळाने श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या वरदानाचा देखावा तर सराफ बाजार मित्रमंडळाने भालेकर मैदानावर सुवर्णकार गणेशाचा देखावा सादर केला.जुने नाशिकमध्ये प्रबोधनात्मक देखावेजुने नाशिक परिसरात प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यावर भर देण्यात आला आहे. पाटील गल्लीमधील जनसेवा मित्रमंडळाने व्यसनाधिनता प्राणघातक यावर देखावा सादर केला आहे. नामदेव पथ येथील शिवक्रांती सांस्कृतिक मंडळाने बालपणातील हरविलेले खेळ तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील खेळांचे मुलांवर होणारे परिणाम यावर प्रकाश टाकला आहे. दंडे हनुमान मित्रमंडळाने श्री गणरायाची आकर्षक सुबक मूर्ती उभारली आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक