अभोणा : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ, त्यातच तिघांचा झालेला दुर्देवी मृत्यू अभोणकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.वैद्यकिय विभागाच्या अहवालानुसार अध्याप काही संशियतांचे अहवाल येणे बाकी आहेत. त्याच बरोबर खासगी रु ग्णालयांमध्ये उपचार घेणार्यांचेही अहवाल बाकी आहेत. सामुदायिक संसर्गाची साखळी खंडीत व्हावी यासाठी गेल्या आठवड्यात शहरात स्वयंस्फूर्तीने दि. 8 ते दि. 14 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र बाधितांची संख्या वाढू लागल्याने त्यात पुन्हा सहा दिवसांची वाढ करण्यात येऊन शहरात आजपासून रविवार दि. 20 पर्यंत पर्यंत जनता कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.या काळात फक्त दवाखाने, औषध दुकाने, दुधसंकलन सेवा सुरु राहतील. खबरदारी म्हणून संपूर्ण शहरात ग्रामपालिकेने सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी मोहीम राबविली आहे. दरम्यान,नागरिकांनी विनाकारण फिरू नये, मास्कचा तसेच सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनग्रामपालिका प्रशासक कांतीलाल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड. तालुका वैद्यकिय अधिकारीडॉ. सुधिर पाटील यांनी केले आहे.
अभोण्यात रविवार पर्यंत जनता कर्फ्यू वाढवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:26 IST
अभोणा : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ, त्यातच तिघांचा झालेला दुर्देवी मृत्यू अभोणकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.
अभोण्यात रविवार पर्यंत जनता कर्फ्यू वाढवला
ठळक मुद्दे संपूर्ण शहरात ग्रामपालिकेने सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी मोहीम