शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

विवाहपत्रिकांबाबत सामाजिक संघटना करणार जनजागृती़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:16 IST

विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ या प्रश्नाची सुशिक्षित नागरिक, लॉन्स व मंगल कार्यालयचालक यांच्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली आहे़

नाशिक : विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ या प्रश्नाची सुशिक्षित नागरिक, लॉन्स व मंगल कार्यालयचालक यांच्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली आहे़या संघटनांच्या अध्यक्षांनी जनमानसातील जनजागृतीसाठी पुढाकार घेणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत़  विवाहपत्रिका वाटपाबाबत ‘लोकमत’ने ७ मेपासून जनजागृती अभियान सुरू केले़ या अभियानास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर लोकमतमध्ये प्रकाशित झालेली ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ ही बातमी पाठविली गेली़  लोकमतच्या या अभियानास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, पुढील वर्षीपासून पत्रिका वाटप बंद असा संकल्पही केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत़ लग्नपत्रिका वाटणे हे कष्टदायक काम़ चुकून एखाद्या नातेवाईकास किंवा मित्रास पत्रिका द्यायची राहून गेल्यास रुसवा-फुगवा आणि नाराजी ओढवून घ्यावी लागते. ज्याच्या घरी लग्न आहे त्याला मदत करण्यापेक्षा पत्रिका मिळाली नाही म्हणून जाहीर नाराजी व्यक्त करतात़ या कालावधीतील अपघात पाहता लग्नपत्रिका घरपोच मिळालीच पाहिजे ही मानसिकता बदलली पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दूरध्वनीचा वापर करण्यासाठी जनजागृती करणार आहोत़- बाळासाहेब पोरजे, माजी अध्यक्ष, न्यू गोदावरी ज्युनिअर चेंबर, सातपूरमाहिती तंत्रज्ञानातातील क्रांतीबरोबरच सामाजिक क्रांतीही गरजेची आहे. विवाहाच्या आमंत्रणपत्रिका घरोघरी वाटत बसण्यापेक्षा सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून निमंत्रण देणे काळाची गरज झाली आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने हे काम तर अधिकच सोपे झाले आहे़ त्यामुळे नातेवाइकांनीही आपला समंजसपणा दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़ याबाबत प्रवर्तक संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे़- बजरंग शिंदे, अध्यक्ष, प्रवर्तक सामाजिक विकास संस्था, नाशिकसध्याच्या धावपळीच्या युगात गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वाटप करणे वेळेअभावी शक्य नाही. त्यामुळे काळानुसार आपण बदलले पाहिजे. लग्नपत्रिका घरपोहोच मिळाली तरच लग्नाला जाऊ ही मानसिकता बदलून नवीन साधनांची मदत घेण्याचा सल्ला द्यायला हवा़ सोशल मीडियाचा वापर करून अथवा दूरध्वनीद्वारे आमंत्रण देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेणार आहे़ - बाळासाहेब जाधव  , अध्यक्ष, जनविकास फाउंडेशन, सातपूर

टॅग्स :social workerसमाजसेवक