शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको परिसरात डेंग्यू, मलेरियाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:29 IST

नाशिक शहराच्या तुलनेत सिडको भागात मलेरिया, डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण अधिक असून, याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग सभेत केला होता.

सिडको : नाशिक शहराच्या तुलनेत सिडको भागात मलेरिया, डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण अधिक असून, याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग सभेत केला होता. यामुळे सिडको प्रभागात लोकप्रतिनिधी, महापालिका यांच्या वतीने प्रभागनिहाय जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. सदरची मोहीम नुकतीच प्रभाग क्रमांक २५ व २८ मध्ये राबविण्यात आली.  सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून साथरोग आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिडको भागात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचा आरोप प्रभाग सभेत सर्व नगरसेवकांच्या वतीने करण्यात आला होता.  या पार्श्वभूमीवर महापालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत असून, मनपा कर्मचाऱ्यांकडून प्रभागनिहाय स्वच्छता तसेच धूर व औषध फवारणी करून नागरिकांना प्रबोधन करण्यात येत आहे. सिडको प्रभाग २५ मध्ये सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले.  यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर, श्यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, राकेश ढोमसे तसेच मनपाचे नदीम पठाण आदी सहभागी झाले होते. नागरिकांनीही स्वच्छता ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.प्रभाग २८ मध्ये जनजागृतीसिडको प्रभाग २८ मध्ये महापालिका व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. प्रभागाचे नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार, दीपक दातीर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून, मनपा कर्मचाºयांकडून प्रभागात घरोघरी फिरून फ्रीज, कुलर, पाण्याचे साठे याबाबतचे प्रशिक्षण देऊन आरोग्यविषयी काळजी घेण्यात यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत मनपाचे अधिकारी व ४४ कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटल