सिद्धपिंप्री : तळेगाव येथील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सिद्धपिंप्री येथील ग्रामस्थांनी निषेध सभा घेऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सदर घटना निंदनीय असून या घटनेतील संशयितांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, सोमवारी संपूर्ण गाव बंद करून घटनेचा निषेध नोंदविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (वार्ताहर)
सिद्धपिंप्रीत निषेध; आज गाव बंद
By admin | Updated: October 10, 2016 02:34 IST