शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमुक्त महाराष्टÑसाठी सात हजार कोटीची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:17 IST

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने राज्य सरकारने महाराष्ट्र खड्डेमुक्त अभियान हाती घेतले त्यानुसार राज्यात ५७ हजार किलो मीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : नाशिक जिल्ह्यातील ७० पुलांची दुरूस्तीअभियान यशस्वी करण्यासाठी पुर्वी २८०० कोटी रूपयांची तरतूद

नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पुर्वी २८०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रूपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरूस्तीचे कामे तातडीने केली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खड्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यात सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरूस्तीची कामेही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने राज्य सरकारने महाराष्ट्र खड्डेमुक्त अभियान हाती घेतले त्यानुसार राज्यात ५७ हजार किलो मीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्यात येतअसून, या अभियानात चांगली कामगिरी करणाºयांचे कौतुक करण्यासाठी राज्यभर दौरा केला. नाशिक हा शेवटचा जिल्हा असल्याने नाशिकच्या अधिका-यांनीही चांगले काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी पाटील यांच्या हस्ते चांगले काम करणा-या ५०हून अधिक अधिका-यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.बैठकीच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा सादर केला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक मंडळात सन २०१७ च्या अर्थसंकल्पात ४४ कामे मंजूर असून, चार पुलांची कामे सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पुर्ण झाले. जेट पॅचद्वारे खड्डे भरण्यात येत असल्याने ही कामे टिकाऊ असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच राज्यात काही ठिकाणी पुल कोसळण्याच्या घटना पाहता नाशिक जिल्ह्यातील सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरूस्तीचे कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार जे. पी. गावीत, मुख्य अभियंता एच. एस. पगारे, कार्यकारी अभियंता एस. एस. पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक